औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी जिल्ह्यात २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात अवघ्या ३२ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ५९ जण कोरोनामुक्त झाले.
औरंगाबाद जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ४१८ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४३ हजार ७४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार १९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ३२ रुग्णांत मनपा हद्दीतील २८, ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५० आणि ग्रामीण भागातील ९ अशा एकूण ५९ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली.
मनपा हद्दीतील रुग्ण
न्यू हनुमाननगर १, उल्कानगरी १, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी १, पांडे भवन, किराणा चावडी १, तानाजीनगर १, एन-५, सिडको, श्रीनगर १, गारखेडा, न्यू जयभवानी हाऊसिंग सोसायटी १, एन-५, सिडको २, शाहनूरवाडी, देवानगरी १, पुंडलिकनगर २, अन्य १६.
ग्रामीण भागातील रुग्ण
कन्नड १, अन्य ३.