औरंगाबाद : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु झाले. पण यंत्रणेच्या क्षमतेपेक्षा अत्यंत कमी लस डोस जिल्ह्याला मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत १८ वर्षांवरील ७ लाख ३५ हजार नागरिकांनाच पहिला डोस मिळाला आहे. लसीकरण सध्याच्या गतीनेच चालले तर १८ वर्षांवरील सर्वांना पहिला डोस देण्यासाठीच किमान दोन वर्षे लागतील. त्यात दुसऱ्या डोसची आणखी वाईट अवस्था आहे. चकरा मारूनही दुसरा डोस मिळत नसल्याची परिस्थिती आहे. ( at the current rate, everyone over the age of 18 will need 2 years for the first corona dose )
जिल्ह्याची लोकसंख्या ४५ लाखांच्या घरात आहे. यात १८ वर्षांवरील नागरिकांची म्हणजे लसीकरणाच्या लाभार्थ्यांची संख्या ही ३२ लाख ८७ हजार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रोज ४० हजार नागरिकांना लस देण्याची आरोग्य यंत्रणेची क्षमता आहे. या क्षमतेनुसार नागरिकांना डोस देण्यात आले तर अवघ्या २ महिन्यांत १८ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस देऊन पूर्ण होईल. मात्र, औरंगाबादेत प्रारंभीपासूनच पुरेशाप्रमाणात लस मिळत नाही. कोविड लसीकरणाचे नोडल ऑफिसर डाॅ. महेश लड्डा म्हणाले, प्राप्त होणाऱ्या लसी डोसनुसार लसीकरण होत आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस ८४ दिवसानंतर, तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर दिला जात आहे.
पहिल्या डोसनंतरही सुरक्षाग्रामीणची लोकसंख्या अधिक असल्याने तेथे अधिक डोस लागतात. मनपा एका दिवसात किमान १५ हजार नागरिकांचे लसीकरण करू शकते. मनपाला ४५ हजार लस दिल्या तर ३ दिवस लसीकरण करू शकतात. परंतु त्यातुलनेत कमी लसी मिळत आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर अर्धी सुरक्षा मिळते. कोरोना झाला तरी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लागण्याचे, प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण कमी होते.- डाॅ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक
१८ वर्षांवरील नागरिकांची संख्या-३२,८७,८१४१६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणास प्रारंभ१२ जुलैपर्यंत पहिला डोस-७,३५,०१९१२ जुलैपर्यंत दुसरा डोस-२,१३,७३१
सध्याचीच गती राहिली तर असे होईल लसीकरण : १२ जानेवारी २०२२ पर्यंत पहिला डोस-१४,७०,०३८१२ जानेवारी २०२२ पर्यंत दुसरा डोस-४,२७,४६२१२ जुलै २०२२ पर्यंत पहिला डोस-२२,०५,०५७१२ जुलै २०२२ पर्यंत दुसरा डोस-६,४१,१९३१२ जानेवारी २०२३ पर्यंत पहिला डोस-२९,४०,०७६१२ जानेवारी २०२३ पर्यंत दुसरा डोस-८,५४,९२४