शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

पर्यटननगरी औरंगाबादला ‘कोरोना’चा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 4:32 AM

कोरोना विषाणूचा पर्यटकांनीदेखील धसका घेतला आहे. परिणामी, पर्यटनाचे नियोजन रद्द करण्यावर भर देण्यात येत आहे.

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा पर्यटकांनीदेखील धसका घेतला आहे. परिणामी, पर्यटनाचे नियोजन रद्द करण्यावर भर देण्यात येत आहे. पर्यटननगरी औरंगाबादला याचा मोठा फटका बसत असून, मार्च महिन्यांतील ७० टक्के बुकिंग रद्द झाली. त्यामुळे हॉटेल्स, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.जगभरातील पर्यटक भारतातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येतात. भारतात येणारे बहुतांश परदेशी पाहुणे हे जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना आवर्जून भेट देतात. शहरातील बीबी का मकबरा, पाणचक्की याठिकाणी भेट देण्यास प्राधान्य दिले जाते. या पर्यटनस्थळावर परदेशी पर्यटकांबरोबर भारतातील विविध भागांतून येणाऱ्या पर्यटकांचीही संख्या अधिक आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथून विमानाने दाखल होऊन पर्यटक वाहनांनी अजिंठा, वेरूळ लेणीला जातात. औरंगाबादेत येण्यापूर्वी पर्यटक हॉटेल, वाहनांची बुकिंग करतात. अनेक महिन्यांपूर्वीच पर्यटनाचे नियोजन झालेले असते; परंतु कोरोनामुळे हे नियोजन रद्द करण्याचे प्रमाण वाढल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.औरंगाबादेत गेल्या काही कालावधीत नव्या विमानसेवा सुरू झालेल्या आहेत. पर्यटनाचा बेत रद्द करण्यात येत असल्याने विमान प्रवासी संख्येवरही परिणाम होणार आहे. देश-विदेशांतील पर्यटकांना भारतातील ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडविणारी आलिशान डेक्कन ओडिसी औरंगाबादेत मार्चमध्ये वेगवेगळ्या दिवशी दाखल होणार आहे. या शाही रेल्वेने येणाºया पर्यटकांच्या संख्येतही घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.१५० रूमची बुकिंग रद्दशहरातील एका हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले, की मार्च महिन्यातील १५० रूमची बुकिंग रद्द करण्यात आली आहे. इटलीसह इतर देशांतून येणाºया पर्यटकांनी बुकिंग रद्द केली आहे. जालना रोडवरील ज्या हॉटेलमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात थांबतात, तेथील काही बुकिंगही रद्द झाल्याचे सांगण्यात आले. इतर हॉटेल्समध्येही अशी परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले.>व्यवसायावर परिणामआपल्याकडे मार्चपर्यंत पर्यटनाचा हंगाम असतो; परंतु गेल्या काही दिवसांत मार्चमधील जवळपास ७० टक्के बुकिंग रद्द झाली आहेत. विमान प्रवाशांच्या संख्येवरही परिणाम होत आहे. या सगळ््याचा हॉटेल व्यवसाय, ट्रॅव्हल्स व्यवसायावर परिणाम होत आहे. डेक्कन ओडिसीने येणाºया पर्यटकांच्या संख्येवरही परिणाम होण्याची भीती आहे.- जसवंतसिंह राजपूत,अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझमडेव्हलपमेंट फोरमपर्यटकांची संख्या घटलीऔरंगाबादेत पर्यटनासाठी येण्यापूर्वी वाहनांची बुकिंग केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत मार्चमधील ३० टक्के बुकिंग रद्द झाली आहे. कोरोनामुळे परदेशी पर्यटक येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी, व्यवसायाला फटका बसत आहे.- अब्दुल अजीज, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या