तीन रूग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी
औरंगाबाद : नाशिक येथील ऑक्सिजन गळतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोठ्या रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था कशी आहे त्याची कार्यप्रणाली कशी चालते याची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी एमजीएम, डॉ.हेडगेवार, कमलनयन बजाज रुग्णालय येथील ऑक्सिजन प्लांट, फायर प्लांटची पाहणी केली. पांडेय यांच्यासोबत जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दाैड, प्रदीप कुलकर्णी यांची एक तज्ज्ञ टीम होती. ही टीम दररोज शहरातील इतर रुग्णालयांना भेट देऊन येथील ऑक्सिजन प्लांट व फायर प्लांटची पाहणी करणार आहे.
संचारबंदीत फिरणाऱ्या १९९ नागरिकांची तपासणी
औरंगाबाद : संचारबंदीत विनाकारण शहरातील प्रमुख रस्त्यांवर फिरणाऱ्या १९९ नागरिकांची पोलीस आणि मनपाच्या संयुक्त पथकाने तपासणी केली. यामध्ये तीन नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले.