ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तपासणी करून रुग्ण शोधून त्यांना औषधोपचार करणे गरजेचे असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशान्वये खुलताबाद-औरंगाबाद मार्गावरील कागजीपुरा येथे घाटाच्या अँटिजन तपासणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, विस्तार अधिकारी कहाटे, आरोग्य विस्तार अधिकारी शशिकांत ससाणे, कागजीपुराचे सरपंच शेख अहेमद, मावसाळाचे सरपंच अतिशय देवगिरीवर, पोलीस जमादार रतन वारे, भाले, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : खुलताबाद-औरंगाबाद मार्गावरील कागजीपुरा येथे कोरोना तपासणी चेकपोस्टचे उद्घाटन करताना गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर व इतर उपस्थित होते.