छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात जवळपास दीड वर्षांनंतर उपचारासाठी कोरोना रुग्ण दाखल झाला. या रुग्णावर वार्ड क्रमांक-४ मध्ये उपचार सुरू आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली.
कोरोनाचा नवीन विषाणू जेएन-१ चा संसर्ग अधिक वाढू नये यासाठी शासन निर्देशानुसार महापालिकेने तपासण्यांवर अधिक भर दिला असून, मागील तीन आठवड्यांमध्ये १ हजार ७३१ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. दोन रुग्णांमध्ये जेएन-१ विषाणू आढळून आला.
महापालिकेचे ४१ आरोग्य केंद्र, ५ आपला दवाखाना, ८ आरोग्यवर्धिनीमध्ये कोरोना तपासण्या सुरू केल्या आहेत. डिसेंबर महिन्यात १७३१ जणांच्या तपासण्यात केल्या. त्यापैकी ४० जण बाधित आढळून आले. नोव्हेंबर महिन्यात ३४१ चाचण्या करण्यात आल्या होत्या, एकही पॉझिटिव्ह नव्हता. मागील सहा दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णाची भर पडत आहे. बहुतांश रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहे. मात्र, आता एक रुग्ण घाटीत दाखल झाला. त्यामुळे घाटी रुग्णालय प्रशासन अलर्ट झाले आहे.
बुधवारी ६ कोरोनाबाधित आढळलेकोरोनाचे बुधवारी आणखी सहा रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४६ असून आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ५३ च्या वर पोहचली आहे. बुधवारी ११ रुग्ण कोरोना मुक्त्त झाले आहे. दिवसभरात १७१ संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यातून ६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. पडेगाव येथील कादरी हॉस्पिटलजवळ, रेणुकामाता मंदिर एन-९, अयोध्यानगर एन-७, भगतसिंगनगर हसूल, विश्वरत्ननगर, अंबिकानगर या भागातील रुग्ण आहेत.