औरंगाबाद : कोविडसंदर्भात लावण्यात आलेले निर्बंध शहरात शिथिल करण्यात आले आहेत. शहर पहिल्या गटात आहे. मात्र, ग्रामीण भाग तिसऱ्या गटात असल्यामुळे अनेक निर्बंध कायम राहणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी नाक्यावर केली जाणार आहे. तसेच शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्यांचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिली.
सीईओ डॉ. गोंदावले म्हणाले, अनलॉकची प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे. ग्रामीण भागाला पहिल्या गटात आणण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. संख्या वाढविल्यानंतर पॉझिटिव्हिटीचा रेट कमी होईल. हा रेट कमी झाल्यानंतरच आपल्याला पहिल्या गटात जाता येणार आहे. यासाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या आणि शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या एण्ट्री पॉईंटवर केल्या जाणार आहेत.
अनलॉकची प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे. ग्रामीण भागाला पहिल्या गटात आणण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. संख्या वाढविल्यानंतर पॉझिटिव्हिटीचा रेट कमी होईल. हा रेट कमी झाल्यानंतरच आपल्याला पहिल्या गटात जाता येणार आहे. यासाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या आणि शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या एण्ट्री पॉईंटवर केल्या जाणार आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. याशिवाय ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार विविध ठिकाणी कॅम्पचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गोंदावले यांनी दिली. लसीकरणातही सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.