शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

लसीकरणात औरंगाबाद जिल्हा पिछाडीवरून आघाडीवर, मराठवाड्यात ठरला अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2021 6:15 PM

corona vaccination in Aurangabad : जिल्ह्यातील १६ लाख ८६ हजार नागरिकांना पहिला डोस देत ७८ टक्के उद्दिष्ट गाठले गेले.

औरंगाबाद : लस घेतली नसेल तर रेशन मिळणार नाही, असा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा मिळताच ग्रामीण भागात रांगा लावून नागरिकांनी लस घेण्यास सुरुवात केली (corona vaccination in Aurangabad ). लसीकरणाच्या बाबतीत सतत पिछाडीवर असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्याला मागे टाकत मराठवाड्यात प्रथम स्थान पटकावत १६ लाख ८६ हजार (राज्यात १६व्या स्थानी) नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले. रविवारपर्यंत जिल्ह्यातील ७८ टक्के नागरिकांनी पहिला डोस, तर ३१ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील केवळ ४६ टक्के नागरिकांनी लस घेतली होती. यानंतर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी ९ तालुक्यांसाठी प्रत्येकी एक नोडल अधिकारी नियुक्त केला आणि लसीकरण मोहिमेत तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, जि. प., पं.स. पदाधिकाऱ्यांची मदत घेतली. लसीकरणाला प्रतिसाद न देणाऱ्या गावांत स्वत: मुक्कामी राहून नागरिकांना प्रोत्साहन दिले. यानंतर सर्व यंत्रणा झाडून कामाला लागली आणि महिनाभरात लसीकरणाला वेग आला. सतत पिछाडीवर असलेला औरंगाबाद जिल्हा आज मराठवाड्यात अव्वलस्थानी आला आहे. जिल्ह्यातील १६ लाख ८६ हजार नागरिकांना पहिला डोस देत ७८ टक्के उद्दिष्ट गाठले गेले.

‘हर घर दस्तक’च्या पाहणीत २ लाख लोकसंख्या कमीकोविड लसीकरण मोहीम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी जि. प.ने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक घरात जाऊन मतदार यादीनुसार १८ वर्षांवरील किती नागरिकांचे लसीकरण झाले, याची माहिती घेतली. मतदार यादीनुसार जिल्ह्यात २१ लाख ६९हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत ही संख्या दोन लाखांनी कमी असल्याची माहिती समोर आली. या माहितीची पडताळणी आता जि. प.ने सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. या आकडेवारीत तथ्य असल्यास विद्यमान लसीकरणाची टक्केवारी ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.

मराठवाड्याची क्रमवारीजिल्हा क्रमऔरंगाबाद १६ वा उस्मानाबाद २३ वालातूर २७ वापरभणी २८ वाहिंगोली ३२ वाबीड ३३ वानांदेड ३४ वा

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या