कोवीड लसीकरणाचा पहिला डोस वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डोईफोडे यांना देण्यात आला. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना भाले यांनी लस घेतली. फुलंब्री तालुक्यात पहिल्या टप्प्यात १०३४ जणांना ही लस दिली जाईल. यात आरोग्य विभागातील सरकारी कर्मचारी ८३८ तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक ३९६ जणांचा समावेश आहे. कोरोनाची लस घेण्यास कोणतीही अडचण नाही. याचा त्रास होत नाही. कर्मचारी नागरिक यांनी या लसीपासून घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना भाले यांनी केले आहे.
-------------------फोटो कॅप्शन : फुलंब्री तालुक्यात लसीकरणाचा पहिला मान डॉ. गणेश डोईफोडे यांना मिळाला, यावेळी नगराध्यक्ष सुहास सिरसाठ, पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे यांची उपस्थिती होती.