शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

Corona Vaccination : औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ११.९७ टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:57 PM

Corona Vaccination in Aurangabad : जिल्ह्यातील लोकसंख्या ३८ लाखांवर आहे. त्या तुलनेत प्राप्त होणाऱ्या लसींचे प्रमाण अत्यल्प आहे.

ठळक मुद्देप्राप्त होणाऱ्या लसींच्या डोसमध्ये १० टक्के डोस हे वेस्टेज पकडण्यात येते. एक व्हायल काढल्यानंतर ४ तासांच्या आत ती वापरणे आवश्यक असते.

औरंगाबाद : औरंगाबादेत १६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात लसीकरण सुरू झाले. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्याचे लसीकरण झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्यात फ्रंटलाइन, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिक आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील लोकसंख्या ३८ लाखांवर आहे. त्या तुलनेत प्राप्त होणाऱ्या लसींचे प्रमाण अत्यल्प आहे. परिणामी, वेळाेवेळी लसीकरणात अडथळा निर्माण झाला. त्यातही १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण थांबविण्याची नामुष्कीही ओढवली. या सगळ्यात जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ११.९७ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे ३८ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी किती वर्षे जातील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

०.६ टक्के डोस वाया- प्राप्त होणाऱ्या लसींच्या डोसमध्ये १० टक्के डोस हे वेस्टेज पकडण्यात येते. औरंगाबादेत लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रारंभी ५ टक्के लस वाया जाण्याचे प्रमाण होते.- एक व्हायल काढल्यानंतर ४ तासांच्या आत ती वापरणे आवश्यक असते. त्यासाठी किमान १० लाभार्थी असणे आवश्यक असते. अन्यथा त्या वेळेनंतर डोस वाया जातो.- साधारण ५ टक्के डोस वाया जाणे अपेक्षित असते; परंतु आपल्याकडे एक टक्क्यापेक्षा कमी म्हणजे ०.६ टक्के डोस वाया जाण्याचे प्रमाण असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. विजयकुमार वाघ यांनी सांगितले.

आतापर्यंत झालेले लसीकरण...आरोग्य कर्मचारी- पहिला डोस- ३९, ८५९- दुसरा डोस-२१,६५०- लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-४,१४१

फ्रंटलाइन वर्कर्स-पहिला डोस-६५,२७३-दुसरा डोस-२३,८६०-लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-७२७

ज्येष्ठ नागरिक-पहिला डोस-१,४७,४६१-दुसरा डोस-४२,०९७-लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-४२,५३९

४५ ते ५९ वयोगट-पहिला डोस- १,८९,४२७-दुसरा डोस- ४१,७७५-लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-१,१०,५७३

१८ ते ४४ वयोगट-पहिला डोस- १२,९३१-दुसरा डोस-०-लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-३१,८७,०६९

जिल्ह्याला मिळालेला लसींचा साठा-कोविशिल्ड-५,९२,३००-काेव्हॅक्सिन-४९,८१०

आतापर्यंत झालेले लसीकरण....- कोविशिल्डपहिला डोस-४,३३,६३७दुसरा डोस-१,१८,३८४

- कोव्हॅॅक्सिनपहिला डोस-२१,३१४दुसरा डोस-१०,९९८

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद