शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Corona Vaccine : तरुणाईचा लसीकरणास जोरदार प्रतिसाद; पाच दिवसांत ६० हजार तरुणांनी घेतली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 5:48 PM

Corona vaccine : मनपा प्रशासनाने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली असून दररोज १२ ते १४ हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे.

ठळक मुद्देशहराचा चार लाखांचा टप्पा पार दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढतेय

औरंगाबाद : केंद्र शासनाने १८ वर्षांवरील सर्वांंना लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर औरंगाबाद शहरात तरुणाईकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मागील पाच दिवसांतच सुमारे ६० हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. त्यामुळे शुक्रवारी लसीकरणाने शहरात चार लाखांचा टप्पा पूर्ण केला. दुसरा डोस घेण्यासाठीही नागरिक आता विविध केंद्रांवर गर्दी करीत आहेत. (In five days, 60,000 young people received the corona vaccine )

मनपा प्रशासनाने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली आहे. दररोज १२ ते १४ हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. मंगळवार, २२ जूनपासून ६९ केंद्रांच्या माध्यमातून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन केले. २० जूनपर्यंत शहरात तीन लाख ३९ हजार ८२७ जणांचे लसीकरण झाले होते. त्यात १८ ते ४४ वयोगटातील २७ हजार ३०१ नागरिकांनी पहिला डोस घेतलेला होता. २४ जूनपर्यंत तीन लाख ९३ हजार १५३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यात १८ ते ४४ वयोगटातील तरुणांची संख्या ७६ हजार ७६५ एवढी आहे. शुक्रवारी दिवसभरात १४ हजारांपेक्षाही अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी शहराने चार लाखांच्या लसीकरणाचा टप्पा पार केला. सध्या प्रत्येक केंद्रावर किमान २०० जणांचे लसीकरण केले जात आहे. मनपाने नोंदणी न करताच थेट लस घेण्यासाठी केंद्रावर या, असे आवाहन केल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

आता सोसायट्यांमध्ये लसीकरणशहरातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण जलदगतीने करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून विविध सोसायट्यांमध्येही लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी लसीकरणाची मोबाइल टीम तयार केली आहे. सोसायटींतील २०० लाभार्थींची यादी सादर केल्यास अशा सोसायटींच्या ठिकाणी पालिकेकडून लसीकरण शिबिर घेतले जाणार आहे.

लसीकरणाचा आलेख- एक लाखाचा टप्पा : १ एप्रिल- दोन लाखांचा टप्पा : २४ एप्रिल- तीन लाखांचा टप्पा : २९ मे- चार लाखांचा टप्पा : २५ जून

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका