शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर बस मार्शलनं फेकलं पाणी...! दिल्ली पोलिसांनी पलटवली AAP ची कहाणी
2
सातत्याने वाढतायत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार, चिन्मय दास यांच्यानंतर आणखी एका आध्यात्मिक गुरूला अटक
3
"आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा"; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान
4
"ही आमच्या प्रगतीची किंमत..."; अमेरिकेत झालेल्या आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले!
5
कल्याण ग्रामीणमध्ये दोन माजी आमदारांनी पुन्हा मतमोजणीसाठी केला अर्ज!
6
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
7
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
8
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
9
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
10
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
11
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
12
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
13
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
14
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
15
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
16
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
17
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
18
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
19
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
20
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”

Corona Vaccine : एक अब्ज डोस उत्पादनाची क्षमता, आणखी एका लसीच्या उत्पादनासाठी औरंगाबादच्या वोक्हार्टच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 12:54 PM

Corona Vaccine : वोक्हार्ट इंग्लंडमधील कंपनीच्या सहकार्याने जागतिक बाजारपेठेत कोरोना नियंत्रणाची लस आणणार असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनंतर लसींचे उत्पादन करणारी वोक्हार्ट ही राज्यातील दुसरी कंपनी ठरणार आहे.

ठळक मुद्देलसींचे एक अब्ज डोस उत्पादनाची क्षमता शेंद्रा येथील प्रकल्पात करणार काम

- विकास राऊत

औरंगाबाद : वोक्हार्ट या फार्मास्युटिकल्स कंपनीच्या येथील शेंद्रा पंचातारांकित औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रकल्पातून कोरोना नियंत्रणावरील लसींचे उत्पादन करण्यात येणार आहे. याबाबत इंग्लंडमधील कंपनीशी कराराच्या अनुषंगाने सुरू असलेली बोलणी अंतिम टप्प्यात असून, येथील प्रकल्पात त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली.

वोक्हार्ट इंग्लंडमधील कंपनीच्या सहकार्याने जागतिक बाजारपेठेत कोरोना नियंत्रणाची लस आणणार असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनंतर लसींचे उत्पादन करणारी वोक्हार्ट ही राज्यातील दुसरी कंपनी ठरणार आहे. गेल्यावर्षी वोक्हार्ट कंपनीच्या इंग्लंडमधील प्रकल्पाला तेथील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भेट दिल्यानंतर लस उत्पादनाबाबत चर्चा केली होती. त्यानुसार औरंगाबाद येथील शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील बायोटेक पार्कमध्ये लसींचे उत्पादन सुरू करण्याचे हळूहळू निश्चित होत आहे.

उत्पादन किती असेल, वर्षाकाठी किती लसीचे उत्पादन करण्यात येणार असून, त्याचे नाव काय असेल, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. इंग्लंडमधील कंपनीच्या सहकार्याने वोक्हार्ट स्वत: लसीचे उत्पादन करून बाजारपेठेत आणणार असल्याचे समजत आहे. शेंद्रा येथील प्रकल्पात उत्पादन क्षमता मोठी असून, यासाठी कंपनी तातडीने शेंद्र्यात विस्ताराची योजनादेखील हाती घेऊ शकते, अशी उद्योग वर्तुळात चर्चा आहे. या उत्पादनांच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे मागील वर्षाचे थकीत इन्सेटिव्ह देण्याची प्रक्रिया कंपनीत सुरू असल्याची माहिती समजली आहे. १ हजारच्या आसपास मनुष्यबळ उत्पादन प्रक्रियेत लागण्याची शक्यता आहे. या लसीच्या उत्पादनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीच्या इतर उत्पादनांना चालना मिळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे कोरोनावरील लस उत्पादनात कंपनी पाऊल टाकत असल्याचे दिसते. गेल्यावर्षी केंद्र सरकारच्या यादीत लस उत्पादनात वोक्हार्टचा समावेश नव्हता.

शेंद्र्यातच उत्पादन होणारवोक्हार्ट बायोटेक पार्क येथील वरिष्ठ सूत्रांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन या लसींप्रमाणेच स्वतंत्र लस उत्पादन करण्यात येणार आहे. ते उत्पादन येथेच होणार आहे. लसीचे उत्पादन आम्ही शेंद्र्याच्या प्रकल्पात करणार आहोत. काही बाबी इंग्लंडमधील कंपनी आणि वोक्हार्ट यामध्ये गोपनीय आणि करारांतर्गत आहेत. त्यामुळे याबाबत जास्तीची माहिती देता येणार नाही.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद