औरंगाबाद : जानेवारी २०२१ मध्ये प्रारंभी मोजक्याच नागरिकांसाठी लसीकरण सुरू असताना केंद्र सरकारकडून औरंगाबाद शहराला तब्बल २५ हजारांपर्यंत डोस देण्यात येत होते. आता लसीची मागणी प्रचंड वाढलेली असताना अवघ्या ५ हजारांवर बोळवण करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या या अजब धोरणामुळे दुसऱ्या डोससाठीची प्रतीक्षा यादी प्रचंड वाढत आहे. बुधवारी ही संख्या तब्बल ५५ हजारांपर्यंत गेली. ( corna viwhich is available up to Rs 25,000, is now only Rs 5,000)
जानेवारी महिन्यात हेल्थलाइन वर्कर, फ्रंटलाइन वर्कर, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील विविध आजार असलेल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. प्रारंभी लसीकरणाला अजिबात प्रतिसाद मिळत नव्हता. हजारो डोस पडून राहत होते. १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे धोरण आल्यानंतर लसीकरणाने वेग घेतला. अल्पावधीत शहरात पहिला, दुसरा मिळून ५ लाख डोस देण्यात आले. मात्र, आता केंद्राकडून लसींचा पुरवठा अत्यंत कमी होतो आहे. ५ ते ७ हजारांपेक्षा जास्त लस मिळत नाही. आलेल्या लस अवघ्या दीड ते दोन तासांमध्ये संपतात. लसीकरण केंद्रावर प्रचंड गोंधळ सुरू आहे. दररोज कुठेना कुठे केंद्रांवर पोलिसांना पाचारण करावे लागत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणाही लसच्या तुटवड्यामुळे मेटाकुटीला आली आहे. मंगळवारी एमआयटी येथील लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिन संपल्यावर दुसरा डोस (कॉकटेल) कोविशिल्डचा द्या असा आग्रह नागरिकांनी धरला. आमच्या रिस्कवर आम्ही लस घेतोय, तुम्ही द्या, म्हणून गाेंधळ घालण्यात आला.
खासगी कंपन्यांचा मनपाकडे आग्रहशहराच्या आसपास असलेल्या कंपन्या, खासगी व्यवस्थापनांनी मनपाकडे आमच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून द्या म्हणून आग्रह धरला आहे. मनपाने आतापर्यंत एकाही संस्थेचा अर्ज मंजूर केलेला नाही. शहरात रांगेत उभे असलेल्या नागरिकांना देण्यासाठी लस नाही, तर खासगीतील कर्मचाऱ्यांना कशी लस देणार, असा प्रश्न आरोग्य विभागानेच उपस्थित केला आहे.
दुसरा डोस ९० टक्के, १० टक्के पहिला डोसशासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात मनपाला लस उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांना ९० टक्के डोस देण्यात येतील. १० टक्के लस पहिल्या डोससाठी राहतील, असे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
आतापर्यंत शहरात प्राप्त झालेले डोसकोविशिल्डजानेवारी - २०,०००फेब्रुवारी- ३०, ०००मार्च- ४३,८००एप्रिल- १,३६,०००मे- ८३,८५०जून- ७८,०१०जुलै- २८,१०० (कालपर्यंत)
कोव्हॅक्सिन३७,०९० आतापर्यंत प्राप्तकोविशिल्ड-कोव्हॅक्सिन खासगी रुग्णालये३९,५७३ (कालपर्यंत)