शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

Corona Vaccine : लस न घेता बाजारात फिरल्यास दंड; ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांवर महापालिका करणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 3:09 PM

Corona Vaccine : या वयोगटातील दीड लाख नागरिकांची लस घेतली असलीतरी आणखी तीन लाख नागरिक लस घेण्यास शिल्लक राहिले आहे.

ठळक मुद्देमनपाकडे २० हजार लस शिल्लक, लाभार्थी येईनात

औरंगाबाद : महापालिकेकडे सध्या २० हजार लस शिल्लक असतानाही ४५ वर्षांवरील लाभार्थी लस घेण्यासाठी केद्राकडे फिरकत नसल्याचे चित्र पहायला मिळात आहे. लस न घेता बाजारात फिरणाऱ्या ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांवर आता महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे.

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी होत होती. लस घेण्यासाठी केंद्रावर रांगा लागत होत्या. त्यावेळी लसीचा पुरवठा कमी होत असल्याने प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांनी वाढवले. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास तीन महिने लस घेता येणार नसल्याचे जाहीर केले. दुसरा डोस ८४ दिवसांनी घ्यावा लागणार असल्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांची लस घेण्यासाठी होणारी गर्दी एकदम कमी झाली. या वयोगटातील दीड लाख नागरिकांची लस घेतली असलीतरी आणखी तीन लाख नागरिक लस घेण्यास शिल्लक राहिले आहे.

या संदर्भात मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, मनपाकडे सध्या २० हजार कोविशिल्ड लस शिल्लक आहे. परंतु लस घेण्यासाठी नागरिक येत नाहीत. ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेता येतो. अद्यापही तीन लाख नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. दुसरा डोस घेण्यासाठी ८४ दिवसानंतर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक लस घेण्यासाठी येत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांसाठी लस शिल्लक असल्यामुळे त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बाजारातील गर्दी रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईमागील दोन दिवसांपासून बाजारात प्रचंड गर्दी होत आहे. आणखी काही दिवस अशीच गर्दी राहिली तर संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. लस न घेता बाजारात फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले.

टॉप फाइव्ह लसीकरण केंद्र : केंद्राचे नाव - लस संख्याएन-८ - २०,६८१बन्सीलाल नगर - १८,५००सिडको एन - १७,८९९जिल्हा रुग्णालय - १४,७१४छावणी - १२,६४८

सर्वांत कमी लसीकरण असलेले केंद्र : केंद्राचे नाव - लस संख्याशहाबाजार आरोग्य केंद्र - ५७६जुना बाजार आरोग्य केंद्र - १२४५गणेश कॉलनी आरोग्य केंद्र - १५४१नेहरूनगर आरोग्य केंद्र - १८१७गरम पाणी आरोग्य केंद्र - २०६९

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका