औरंगाबाद : औरंगाबादेत गुरुवारी सकाळी १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या आता ३७३ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली.
आज सकाळी जयभीमनगर येथे २ , किलेअर्क येथे २, हक टॉवर रेलवेस्टशन रोड येथे ५ , पुंडलीकनगर येथे ५ आणि कटकट गेट येथे ३ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे.
५१ भागांत कोरोनाची लागणआतापर्यंत शहरातील ४६ भागांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. बुधवारी त्यात ५ नव्या भागांची भर पडल्याने आता ही संख्या ५१ झाली आहे. यात ४० भागांतील रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ११ भागांतील काही रुग्ण कोरोनामुक्त, तर काहींचा मृत्यू झालेला आहे.
२ हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढघाटी परिसरातील जयभीमनगर आणि मुकुंदवाडीतील संजयनगर-रोहिदासनगर या दोन हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जयभीमनगर येथील रुग्णसंख्या आता ६१ झाली आहे. तर संजयनगर-रोहिदासनगर येथील रुग्णसंख्या ६७ वरून ७४ झाली आहे. शहरात सर्वाधिक रुग्णसंख्या या दोन हॉटस्पॉटमध्ये आहे.