शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

Corona Virus in Aurangabad : शहरातील ५ तर ग्रामीण भागातील १० कोरोना रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 12:12 PM

Corona Virus in Aurangabad : उपचारानंतर जिल्ह्यातील ५४६ रुग्णांना रुग्णालयातून सुटी

ठळक मुद्देसध्या जिल्ह्यात ६,३४३ रुग्णांवर उपचार सुरूबुधवारी दिवसभरात ५७८ नव्या रुग्णांची वाढ 

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ५७८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ५४६ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले, तर गेल्या २४ तासांत २१ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद शहरातील ५, ग्रामीण भागांतील १० आणि अन्य जिल्ह्यांतील ६ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ६ हजार ३४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ६१३ एवढी झाली आहे. तर आतापर्यंत एक लाख २९ हजार २८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,९८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ५७८ नव्या रुग्णांत शहरातील २१४ तर ग्रामीण भागामधील ३६४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ११२ आणि ग्रामीण भागातील ४३४ अशा ५४६ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना पाल, फुलंब्रीतील ६० वर्षीय महिला, वैजापूर येथील ६० वर्षीय पुरुष, पारगाव, पैठण येथील ६८ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ५५ वर्षीय महिला, गोंडगाव, सोयगाव येथील ६६ वर्षीय पुरुष, बजाजनगर, वाळूज येथील ४८ वर्षीय महिला, लिंबगाव, पैठण येथील २७ वर्षीय पुरुष, जैतापूर, कन्नड येतील ७५ वर्षीय महिला, लाडगाव, कुंभेफळ येथील ८५ वर्षीय महिला, पैठण येथील ८४ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील ८० वर्षीय पुरुष, आदित्यनगर, हर्सूल येथील ६३ वर्षीय महिला, जाधवमंडी येथील ७० वर्षीय पुरुष, एन-२ येथील ६१ वर्षीय पुरुष, एन-१२ येथील ७१ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ५५ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, ७५ वर्षीय महिला, ८६ वर्षीय महिला, डांबरी, पाटोदा येथील ५५ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ३५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णघाटी परिसर १, सिडको १, देवळाई २, गारखेडा २, सातारा परिसर २, बीड बायपास रोड १, खडी रोड १, अलाल कॉलनी १, शहानुरमियाँ दर्गा १, अरिहंतनगर ३, गणेशनगर २, जय भवानीनगर ८, शिवाजीनगर ३, गजानन कॉलनी २, आकाशवाणी १, राजनगर १, पद्मपुरा १, नाथनगर १, हनुमाननगर १, न्यू हनुमाननगर १, संजयनगर ३, न्यू गणेशनगर १, पुंडलिकनगर १, खाराकुआँ १, सुधाकरनगर १, लक्ष्मी कॉलनी १,मयूर पार्क ३, जाधववाडी १, ऑडिटर सोसायटी १, भाग्यनगर १, उल्कानगरी १, भावसिंगपुरा १, रेणुकानगर १, हर्सूल जेल २, एम. आय. डी. सी चिकलठाणा १, वसंतनगर १, एन-४ येथे २, एन-७ येथे ५, एन-२ येथे २, एन-१० येथे १, एन-११ येथे ३, एन-५ येथे १, एन-६ येथे १, एन-१ येथे १, एन-८ येथे १, एन-१३ येथे १, एन-९ येथे १, अन्य १३८

ग्रामीण भागातील रुग्णहिंदुस्तान आवास, कांचनवाडी २, नक्षत्रवाडी १, रांजणगाव २, बजाजनगर ३, डोणगाव ता. कन्नड १, चिकलठाणा ३, देवराई रोड १, पडेगाव १, वडाखा १, परसोडा ता. वैजापूर १, चित्तेपिंपळगाव १, मार्केट यार्ड रोड ता. गंगापूर १, पिसादेवी १, मानकी पो. पालेदवी १, हर्सूल सावंगी ३, नायगाव १, एम.आय. डी. सी. वाळूज १, गोलवाडी २, पळशी तांडा १, मुलानी आडगाव ता. पैठण १, दादगाव १, झाल्टा पो. चिकलठाणा १, हरसिध्दीनगर, कमळापूर वाळूज रोड १, सारा वृंदावन सिडको गार्डन वडगाव कोल्हाटी १, रांजणगाव पोळ ता.गंगापूर १, बकवालनगर, नायगाव १, सिडको वाळूज हॉस्पिटल २, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव १, माळीवाडा १, अन्य ३२५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद