शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी ५६ कोरोना रुग्णांची वाढ; ६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 1:37 PM

Corona Virus In Aurangabad : गुरुवारी ९६ रुग्णांना उपचारादरम्यान सुटी

ठळक मुद्देसध्या ७४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेतजिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,१८० एवढी झाली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या ५६ रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या ९६ रुग्णांना सुटी देण्यात आली, तसेच जिल्ह्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,१८० एवढी झाली आहे. यातील ४२,२७० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर १,१६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ५६ रुग्णांत मनपा हद्दीतील ४५, ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७१ आणि ग्रामीण भागातील २५, अशा ९६ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. पडेगावातील ५२ वर्षीय पुरुष, हर्सूल पिसादेवी रोड येथील ६१ वर्षीय पुरुष, चौका येथील ६० वर्षीय पुरुष, एन-११ नवजीवन कॉलनी येथील ६४ वर्षीय पुरुष, द्वारकानगरातील ७२ वर्षीय स्त्री, अजबनगरातील ७० वर्षीय स्त्री या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ग्रामीण भागातील रुग्ण : मुधलवाडी, पैठण १, अन्य १०.

मनपा हद्दीतील रुग्ण :उस्मानपुरा १, रेल्वे स्टेशन १, छावणी परिसर १, एन-३ सिडको १, उल्कानगरी १, बीड बायपास १, रामनगर २, पहाडसिंगपुरा १, रेल्वे स्टेशन परिसर २, मछली खडक १, आविष्कार कॉलनी १, ईटखेडा १, अयोध्यानगर १, मध्यवर्ती बसस्थानक परिसर १, हरिप्रसादनगर १, एन-११ सिडको १, हर्सूल १, शाहनूरवाडी १, अन्य २५.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद