औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी ६६९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ७५४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. तर गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १८ आणि अन्य जिल्ह्यांतील सहा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या सहा हजार ५९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या एक लाख ३७ हजार ४४ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २७ हजार ५३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,९२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ६६९ नव्या रुग्णांत शहरातील २०६, तर ग्रामीण भागामधील ४६३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १३० आणि ग्रामीण भागातील ६२४ अशा ७५४ रुग्णांना सुटी देण्यात आली.
बिडकीन, पैठण येथील ५० वर्षीय पुरुष, आडगाव येथील ७० वर्षीय महिला, एन-८ येथील ३२ वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ७२ वर्षीय महिला, जरंडी, सोयगाव येथील ६० वर्षीय महिला, एसबीएच कॉलनीतील ७५ वर्षीय महिला, पिरोळा, सिल्लोड येथील ७३ वर्षीय पुरुष, चेतनानगर, हर्सूल ५१ वर्षीय महिला, कारखाना फुलंब्री येथील ३० वर्षीय महिला, शंभूनगर येथील ५२ वर्षीय महिला, भंवरवाडी, कन्नड येथील ३४ वर्षीय पुरुष, वाहेगाव, गंगापूर येथील ७० वर्षीय पुरुष, हनुमाननगर, पैठण येथील ६० वर्षीय पुरुष, अंबिकानगर येथील ६५ वर्षीय महिला, चौधरी कॉलनी, चिकलठाणा येथील ७० वर्षीय महिला, पळशी येथील ६८ वर्षीय महिला, बीड बायपास येथील ५६ वर्षीय पुरुष, उंडणगाव, सिल्लोड येथील ६९ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ६० वर्षीय महिला, ५५ वर्षीय महिला, परभणी जिल्ह्यातील ६२ वर्षीय महिला, बीड जिल्ह्यातील ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्णसातारा परिसर ९, गारखेडा परिसर ४, बीड बायपास ४, शिवाजीनगर ८, घाटी ७, अलाल कॉलनी १, एन-६ येथे ४, कांचनवाडी ६, वानखेडेनगर १, सेवन हिल १, मोंढा नाका १, जाधववाडी २, देवळाई ४, चिकलठाणा २, एन-४ येथे ४, मुकुंदवाडी ५, विठ्ठलनगर ३, श्रध्दा कॉलनी १, जय भवानीनगर ७, राजीव गांधीनगर २, गणेशनगर १, मुकुंदनगर १, न्यू हनुमाननगर २, ठाकरेनगर १, एन-२ येथे २, संत रोहिदासनगर १, श्रीकृष्णनगर १, टीव्ही सेंटर १, व्यंकटेश नगर १, गजानन कॉलनी १, न्यू विशालनगर १, त्रिमूर्ती चौक १, उल्कानगरी १, गजानननगर १, आनंदनगर १, हर्सूल कारागृह क्वाॅर्टर २, एन-७ येथे ६, एकनाथनगर १, हर्सूल ३, सारा वैभव १, पोलीस आयुक्त कार्यालय १, एन-९ येथे २, कार्तिकनगर १, सुरेवाडी २, एन-८ येथे १, नाईकनगर २, सुधाकरनगर २, गाडीवत तांडा १, नागेश्वरवाडी १, पडेगाव १, मयूर पार्क १, आरिफ कॉलनी १, नगरनाका ३, भावसिंगपुरा २, छत्रपतीनगर १, जटवाडा रोड १, रमानगर १, उस्मानपुरा १, काल्डा कॉर्नर १, आकाशवाणी २, शहानूरवाडी १, नक्षत्रवाडी २, जिजामाता कॉलनी २, मिलकॉर्नर १, गणेश कॉलनी १, पटेलनगर १, त्रिमूर्ती चौक १, चाणक्यपुरी १, पद्मपुरा १, रणजीतनगर, काल्डा कॉर्नर १, सूतगिरणी चौक १, जुना भावसिंगपुरा १, छत्रपतीनगर १, भावसिंगपुरा ३, कटकट गेट १, एन-४ येथे १, आर्मी कॅन्टोन्मेंट १, चिश्तिया चौक १, बायजीपुरा १, पुंडलिकनगर १, जाधवमंडी १, सिग्मा १, साईनगर १, म्हाडा कॉलनी १, न्यायनगर १, उत्तरानगरी १, अन्य ४१.
ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर ७, वाळूज एमआयडीसी १, सिडको वाळूज महानगर १, ए.एस. क्लब १, कन्नड १, चिंचोली नकीब १, शेंद्रा १, बांबडा १, घाणेगाव १, बोदवड ता. सिल्लोड १, सातारा १, गंगापूर १, कुंभेफळ ३, पिसादेवी १, काटे पिंपळगाव, ता. गंगापूर १, वडगाव कोल्हाटी ३, गाजगाव, ता. गंगापूर १, वैजापूर १, माळीवाडा १, दौलताबाद १, सिल्लोड १, लासूर स्टेशन ३, पिंपरगव्हाण १, चेंडुफळ, ता. वैजापूर १, देवगाव शनी, ता. वैजापूर १, खुल्ताबाद १, गेवराई १, पानवडोद ता. सिल्लोड १, अन्य ४२३.