शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

Corona Virus : शहरात ७, तर ग्रामीणमध्ये १६ कोरोनारुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 1:15 PM

Corona virus : सध्या जिल्ह्यात ६ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्देशुक्रवारी ४६२ कोरोनारुग्णांची भर दिवसभरात ५७५ रुग्णांची सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात ४६२ रुग्णांची नव्याने भर पडली, तर ५७५ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असलेल्या २३ बाधितांचा मृत्यू झाला, तर ६ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरूआहेत.

शहरातील ११६ तर ग्रामीण भागातील ४५९ रुग्ण शुक्रवारी उपचार पूर्ण झाल्याने घरी परतले. दिवसभरात शहरात १४३ तर ग्रामीण भागात ३१९ बाधित आढळून आले. जिल्ह्यात शहर आणि ग्रामीणमध्ये बाधित आढळून आलेल्यांपेक्षा उपचार पूर्ण झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या घटून ६ हजार १२४ झाली आहे. आजपर्यंत १ लाख ३९ हजार ६०५ रुग्ण बाधित आढळून आले, तर १ लाख ३० हजार ४५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३०२८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले.

शहरात १४३ रुग्णघाटी परिसर ३, राधास्वामी कॉलनी १, हर्सूल ४, नारळीबाग १, नंदनवन कॉलनी १, पैठण गेट १, म्हाडा कॉलनी ४, जालाननगर २, उस्मानपुरा २, वेदांतनगर १, गादीया विहार १, रेल्वे स्टेशन १, गारखेडा ३, ज्योतीनगर १, बालाजी नगर १, गजानननगर २, पडेगाव १, मयूर पार्क ५, जयभवानीनगर २, मेहरनगर १, मुकुंदवाडी ६, एन-१ येथे २, रामनगर २, विठ्ठलनगर १, उल्कानगरी १, हनुमान नगर ३, गजानन कॉलनी १, विजयनगर २, गजानन मंदिर १, भावसिंगपुरा १, हुसेन कॉलनी १, सातारा परिसर ३, बीड बायपास २, चंद्रशेखर नगर १, साई नगर १, नवजीवन कॉलनी १, शिवाजीनगर १, पोलीस कॉलनी १, हडको २, अयोध्या नगर १, सिडको ६, पिसादेवी रोड १, जाधववाडी २, होनाजीनगर १, कटकट गेट १, चिकलठाणा एमआयडीसी १, शहानूरवाडी ३, अरिहंत नगर १, अन्य ५४.

ग्रामीण भागात ३१९ रुग्णग्रामीण भागात ३१९ रुग्ण आढळून आले. तालुकानिहाय औरंगाबाद २८, फुलंब्री ७, गंगापूर ३५, कन्नड ३९, खुलताबाद २५, सिल्लोड २६, वैजापूर ९४, पैठण ५९, सोयगाव ६ रुग्ण आढळले, तर ४ हजार ३८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

२३ बाधितांचा मृत्यूघाटी रुग्णालयात १६ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ७९ वर्षीय महिला वाकळा वैजापूर, ६५ वर्षीय पुरुष पिंप्री राजा, ३७ वर्षीय पुरुष मलवार बुलडाणा, ७० वर्षीय पुरुष नहिद नगर कटकटगेट, ७० वर्षीय महिला चिकलठाणा, ७० वर्षीय पुरुष नालंदा बुद्धविहार, ७२ वर्षीय पुरुष भावसिंगपुरा, ७० वर्षीय पुरुष वैजापूर, ५५ वर्षीय पुरुष कुंभेफळ, ५१ वर्षीय पुरुष कन्नड, ६५ वर्षीय महिला पूनम नगर जटवाडा, ७० वर्षीय पुरुष एमआयडीसी चिकलठाणा, ७० वर्षीय पुरुष पोखरी, ७० वर्षीय महिला उंडणगाव, ५७ वर्षीय पुरुष सावंगी, ५० वर्षीय महिला धामणगाव बदनापूर यांचा मृतांत समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ६५ वर्षीय पुरुष बरतकतपूर, ४० वर्षीय पुरुष गंगापूर, ६० वर्षीय महिला गिरणार तांडा, ६७ वर्षीय पुरुष देवगाव रंगारी, ४४ वर्षीय पुरुष घनवटवाडी, खासगी रुग्णालयातील ४८ वर्षीय पुरुष पिंपळदरी, ४५ वर्षीय पुरुष नागमठाण, ६८ वर्षीय पुरुष एन नऊ सिडको, ६७ वर्षीय पुरुष समर्थनगर येथील बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद