औरंगाबाद : लहान मुलांमध्येही कोरोनाचा (Corona Virus ) संसर्ग वाढू लागला आहे. मागील दहा दिवसांमध्ये तब्बल १८ लहान मुले बाधित झाली आहेत. लहान मुलांमधील संक्रमण चिंता वाढवणारे आहे. ६ ते १८ वयोगटातील तब्बल १४८ जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. (Corona infection growing in children)
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुलांमधील संक्रमण अत्यंत कमी होते. तिसऱ्या लाटेत मागील तीन दिवसांपासून लहान मुलांमध्येही संक्रमण पाहायला मिळत आहे. वातावरणातील बदलांमुळे लहान मुले आणि मोठे नागरिक सर्दी, खोकला आणि तापामुळे हैराण झाले आहेत. खाजगी डॉक्टर लक्षणे ओळखून कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला देत आहेत. तपासणीत अनेक जण बाधित असल्याचे निदर्शनास येत आहे. मंगळवारी औरंगाबाद शहरात तब्बल २८५ जण बाधित आढळून आले. ही आकडेवारी आरोग्य विभागासह प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरत आहे. तिसरी लाट लहान मुलांमध्ये येईल, असे सांगितले जात होते. महापालिका प्रशासनाने गरवारे कंपनीच्या मदतीने १२५ खाटांचे स्वतंत्र रुग्णालय तयार केले. याचा वापर महापालिकेने अद्याप सुरू केलेला नाही. गरज पडली तर भविष्यात या रुग्णालयाचा वापर करण्यात येईल, असे मनपाच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. लहान मुले बाधित आढळून येत असली तरी घाबरण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाने कळविले.
लहान मुलांमधील संक्रमणाची आकडेवारीदिनांक - ० ते ५ - ६ ते १८१२ जाने. ०६ - ३५११ जाने.- ०२ - १८१० ---- ०४ - २७०९-----०३ - १७०८ ----- ०० - १३०७----- ०० - ०७०६ ----- ०२ - १६०५----- ०१ - ०७०४----- ०० - ०७०३----- ०० - ०१