औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात २१६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ८६, तर ग्रामीण भागातील १३० रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला. तब्बल अडीच महिन्यांनंतर मृत्यूचा आकडा ११ वर आला आहे. आतापर्यंत रोज यापेक्षा अधिक मृत्यू होत होते. अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णाचाही मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ३ हजार ४७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात २१ मार्च रोजी ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर मृत्युदर हा वाढत गेला. आता काहीसा कमी झाल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४२ हजार ७३२ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३६ हजार ५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १४३ आणि ग्रामीण भागातील ३२७, अशा ४७० रुग्णांना सुट्टी देण्यात आली. उपचार सुरू असताना सिल्लोड येथील ५५ वर्षीय महिला, नंदनवन काॅलनीतील ६७ वर्षीय पुरुष, तारू पिंपळवाडी, पैठण येथील ६५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ४० वर्षीय महिला, पळशी येथील ६५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष, फुलंब्री येथील ४५ वर्षीय महिला, वैजापूर येथील ४५ वर्षीय पुरुष, पिंप्री, सिल्लोड येथील ३५ वर्षीय पुरुष, बंजारा काॅलनीतील ७५ वर्षीय महिला, एन-१२ येथील ३७ वर्षीय महिला आणि अहमदनगर जिल्ह्यातील ७१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्णअंबर हिल १, पुंडलिकनगर १, ज्योतीनगर १, सिडको, एन-५ येथे १, देवळाई, म्हाडा कॉलनी १, जालाननगर १, नवयुग कॉलनी २, पडेगाव, पोलीस कॉलनी १, भीमनगर, भावसिंगपुरा २, दक्षिण विहार, कांचनवाडी १, हायकोर्ट कॉलनी २, शहानगर ३, सातारा परिसर १, बीड बायपास ३, पैठण रोड १, जिजामातानगर १, अन्य ६३.
ग्रामीण भागातील रुग्णसमतानगर, ता. सिल्लोड १, वाळूज महानगर १, अन्य १२८.