शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

corona virus : औरंगाबाद पालिकेची कमाल, शहरातील प्रत्येक दोन व्यक्तींमागे एकाची केली कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 11:33 AM

corona virus : आरटीपीसीआर, ॲन्टिजन चाचण्यानंतर ९१ हजार पॉझिटिव्ह आढळले 

ठळक मुद्देचाचणी केल्यानंतर ५ लाख ८९ हजार नागरिक निगेटिव्हशहरात आजपर्यंत ८ लाख ५५ हजार कोरोना टेस्ट

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आजपर्यंत महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील अर्ध्याहून अधिक नागरिकांची कोरोना चाचणी केली आहे. तब्बल ८ लाख ५० हजार नागरिकांच्या आरटीपीसीआर, ॲन्टिजन चाचण्या केल्या गेल्या. त्यामध्ये ९१ हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. ५ लाख ८९ हजार नागरिक निगेटिव्ह आढळले. २ लाख ६६ हजार २२४ नागरिकांचे रिपोर्ट अद्याप अप्राप्त आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन महापालिकेने आणखी अडीच लाख तपासणी किटची खरेदी केली. ( Aurangabad Municipal Corporation did Corona test for every one person out of two in the city ) 

शहरात मार्च २०२० पासून कोरोना संसर्ग पसरू लागला. १५ मार्च २०२० ते १५ मार्च २०२१ या एक वर्षाच्या काळात महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्ण शोधणे, तपासण्या, उपचार या त्रिसूत्रीवर भर दिला होता. वर्षभरात ४ लाख ५० हजार कोरोना टेस्ट केल्या. यात आरटीपीसीआरपेक्षा अ‍ॅन्टिजन टेस्टचे प्रमाण अधिक आहे. जानेवारी २०२१ अखेरपर्यंत शहरात कोरोनाची पहिली लाट ओसरली होती. त्यावेळी शहरात दररोज केवळ १० ते १५ बाधित आढळत होते. मात्र, फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात शिरकाव केला आणि मार्च महिन्यापासून या लाटेने उग्र रूप धारण केले. दररोज १ हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळत होते. त्यामुळे मनपा प्रशासनाने टेस्टची गती वाढवली. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत दररोज ४ ते ५ हजार आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिजन टेस्ट केल्या. यातून अधिकाधिक रुग्णांना शोधून बाधितांना वेळीच उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामुळे मे महिन्यापासून शहरातील रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली. ती आता जून महिन्यात दुसरी लाट ओसरल्यात जमा झाली आहे. मागील चार महिन्यांत साडेतीन लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.

योग्य वेळी उचित निर्णयशहरात रुग्ण शोधण्यासाठी मोबाइल टीम तैनात करण्यात आली. शहरात बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी एन्ट्री पॉइंटवर तसेच विमानतळ, रेल्वेस्टेशन येथे तपासण्या सुरू करण्यात आल्या. तपासणीत पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांना थेट कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येत होते. त्यामुळे संसर्गाला ब्रेक लागला.

कोरोना तपासण्यांचा आलेख- एकूण तपासण्या : ८,५५,६०१- निगेटिव्ह : ५,८९,३७७- पॉझिटिव्ह : ९१,१२४-रिपोर्ट अप्राप्त : २,६६,२२४- बाहेरील पॉझिटिव्ह : ४,१३५- शहरातील पॉझिटिव्ह : ८६,९८९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका