शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

'कोरोना'ला झुगारून टाळ-मृदुगांच्या गजरात वारकरी नाथचरणी लीन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 6:57 PM

कोरोनाच्या संकटाला न जुमानता गेल्या दोन दिवसापासून दिसून आलेल्या वारकऱ्यांचा उत्साहाने पैठण नगरीस वारकऱ्यांच्या अगाध श्रध्देची प्रचिती आली.

ठळक मुद्दे यंदाच्या षष्ठीला  वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली नसल्याची खंत पैठणकरांना बोचते आहे.  मठ व मंदिरात वारकरी नसल्याने मठ मंदिरे शांत शांत होती.

- संजय जाधवपैठण : 

    धन्य आजि दिन संत दर्शनाचा।     अनंत जन्मीचा शीण गेला ।|   मज वाटे त्यासी आलिंगण द्यावे|    कदा न सोडावे चरण त्यांचे ।।

या नाथ महाराजांच्या अभंगाप्रमाणे आज लाखो वारकऱ्यांची षष्ठीच्या मुहूर्तावर नाथमहाराजांच्या समाधिचे दर्शन घेतल्या नंतर अवस्था झाली. नाथ महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापीत आलेल्या वारकऱ्यांना आज समाधी दर्शना नंतर अलौकिक असे समाधान प्राप्त झाले. कोरोनाच्या संकटाला न जुमानता गेल्या दोन दिवसापासून आलेल्या वारकऱ्यांचा उत्साहाने पैठण नगरीस वारकऱ्यांच्या अगाध श्रध्देची प्रचिती आली. मुखातून भानुदास एकनाथाचा जयघोष व समोरासमोर भेट होताच एकमेकांचा होणारा चरणस्पर्शाच्या दृश्याने वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेचे दृश्य ठायीठायी दिसून आले. 

नाथषष्ठीच्या निमित्त आज दिवसभर पैठण शहरात अधुनमधून विविध मार्गाने वारकऱ्याच्या छोट्या मोठ्या दिंड्या दाखल होत होत्या. हातात भगवा ध्वज, गळ्यात तुळशीमाळ,  महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखात भानुदास एकनाथाचा जयघोष , हाताने टाळ मृदंगाचा गजर करित शहराच्या रस्त्यावरून दिंड्या मंदिराकडे जात होत्या.

विजयी पांडुरंगास अभिषेक 

आज षष्ठी असल्याने पहाटे गावातील नाथ मंदिरात असलेल्या विजयी पांडुरंगास पंचामृत स्नान व अभिषेक नाथवंशजांच्या वतीने घालून  विधिवत पूजा करून पून्हा स्थानापन्न करण्यात आले. त्याच वेळी बाहेरील नाथ मंदिरातील संत एकनाथ महाराजांच्या समाधिची सुध्दा विधिवत पूजा करण्यात आली.  

नाथ वंशजाची मानाची दिंडी....दुपारच्या वेळी गावातील नाथ मंदिरातून नाथ वंशज व मानकऱ्याची मानाची  निर्याण  दिंडी  पारंपरिक अभंग म्हणून काढण्यात आली या दिंडीच्या अग्रभागी सजवलेला रूबाबदार अश्व, त्या नंतर जरी पटका,  भानुदास महाराजांचे निशाण, झेंडेकरी  त्यानंतर दिंडी विणेकरी,  त्या नंतर अमृतराय संस्थानची छत्री,  नाथवंशजांच्या छत्र्या त्या नंतर संस्थानिक अंमळनेरकर महाराजांची दिंडी, भगवान गडाची दिंडी व सर्वात शेवटी वारकरी अशा क्रमाने अभंगाच्या तालावर मार्गक्रमण करण्यात आले.  मानाची ही दिंडी गावातील नाथमंदिरातून निघून कावळे गल्ली, उदासी महाराज मठ  मार्गे गोदावरीच्या वाळवंटातून  पश्चिम भागातील गोदावरी द्वारातून बाहेरील नाथ मंदिरात नेण्यात आली. या ठिकाणी 

      अवघेची त्रैलोक्य आनंदचि आता । चरणी जगन्नाथा चित्त ठेले ।|      माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ।।       एका जनार्दनी एक पणी ऊभा ।  चैतन्याची शोभा शोभतसे ।।

जलसमाधी घेण्या अगोदर  हाच अभंग घेत नाथमहाराजांनी  शेवटचे किर्तन केले होते, म्हणून हा अभंग परंपरेने घेण्यात आला. यानंतर भानुदास एकनाथाच्या गजरात पूर्व द्वाराने दिंडी बाहेर पडली व परत गावातील नाथ मंदिरात नेण्यात आली. तेथे महाद्वारास भानूदास महाराजांचे निशाण लावून आरतीने सांगता करण्यात आली . नाथवंशजांच्या दिंडीचे परंपरेनुसार आज वाळवंटात नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी स्वागत केले दरवर्षी लाखोच्या संख्येने उपस्थित असलेले वारकरी दिंडीच्या दर्शनासाठी वाळवंटात हजेरी लावतात. गर्दीत लोटालोट होते.  यंदा मात्र वारकरीच उपस्थित नसल्याने  निर्याण दिंडीत मोजकेच वारकरी भाविक उपस्थित होते.

वारकऱ्यांच्या सेवेत खंड.......नाथषष्ठी निमित लाखो वारकरी पैठण शहरात तीन दिवस मुक्कामी असतात. या वारकऱ्यांना आपले पाहुणे आहेत अशा पध्दतीने पैठणकर मदत करतात. वारकऱ्यांना पाणी, नाष्टा, जेवण, चहा, फराळ, आदीबाबत आपआपल्या परिने सेवा देण्याचा प्रयत्न पैठणकरांचा नियमितपणे असतो. अनेक वर्षांपासून परंपरा सुरू असल्याने वारकरी व पैठणकर यांच्यात अध्यात्मिक ऋणानुबंध तयार झाले आहेत. यंदा मात्र कोरोनामुळे पैठण शहरात मुक्कामी राहण्यास वारकऱ्यांना प्रशासनाने मनाई केल्याने वारकऱ्यांना पैठण शहरात थांबता आले नाही. यामुळे यंदाच्या षष्ठीला  वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली नसल्याची खंत पैठणकरांना बोचते आहे. 

मठ मंदीरे रिकामे........नाथषष्ठीच्या दिवशी पैठण शहरातील सर्व मठ मंदिर, मंगल कार्यालये वठारकऱ्यांच्या उपस्थितीने खचाखच भरलेली असतात. या मठा मंदिरातून वारकरी महाराज किर्तन प्रवचन, भजन करतात. यामुळे हरिनामाच्या गजराने पैठण नगरी दुमदुमून जाते. यंदा मात्र मठ व मंदिरात वारकरी नसल्याने मठ मंदिरे शांत शांत होती.

नगराध्यक्षांनी घेतला आढावा......यात्रे दरम्यान नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाय योजनाचा आढावा नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी यात्रा मैदानातील नगर परिषद कार्यालयातून घेतला. यावेळी शहरातील प्रत्येक भागात जंतुनाशक व रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी यंत्रणा वाढवून शहरातील प्रत्येक भागात फवारणी करण्याचे आदेश नगराध्यक्ष लोळगे यांनी केले. यावेळी शहराध्यक्ष विजय चाटुपळे, सतिश आहेर, महेश जोशी, बंडू आंधळे, नगरसेवक बजरंग लिंबोरे, ज्ञानेश घोडके, कल्याण मंत्री, डॉ विष्णू बाबर, अजित पगारे, स्वच्छता निरीक्षक भगवान कुलकर्णी, व्यंकटी पापुलवार, अशोक पगारे खलील धांडे आदी उपस्थित होते.

तहसीलदार यात्रा मैदानात....कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाथषष्ठी निमित्त पैठण शहरात दाखल झालेल्या वारकऱ्यांना सोयी सुविधा व आरोग्य सेवा देण्याचे मोठे आव्हान प्रशासना समोर होते. यात्रेत तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता राजेंद्र बोरकर गेल्या दोन दिवसापासून यात्रा मैदानात तळ ठोकून यंत्रणेचा आढावा घेत होते. या चार खात्याचे अधिकारी सोडले तर बाकीचे नियोजन केवळ कागदावरच दिसून आले. आरोग्य खात्याने यात्रेतील जबाबदारी पार पाडताना कोरोना सारख्या महामारीत हे खाते किती बेफिकीर आहे याची प्रचिती दिली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिकcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस