शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कोरोना आला, ‘लस देता का लस’, पण कोविशिल्ड, कोर्बेव्हॅक्सचा ठणठणाट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 6:40 PM

आधी पाठ, आता मागणी : ५० हजार कोवॅक्सिन डोस होणार ५ दिवसांत मुदतबाह्य

औरंगाबाद : चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची चर्चा सुरू झाली आणि ‘लस देता का लस’ म्हणत नागरिक आरोग्य केंद्रांकडे धाव घेत आहे. मात्र, जिल्ह्यात कोविशिल्ड, कोर्बेव्हॅक्स ठणठणाट असून, एकही लस उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे तर आगामी ५ दिवसांत ५० हजार कोवॅक्सिन डोस मुदतबाह्य होणार असल्याची परिस्थिती आहे.

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर मार्चपासून जनजीवन पूर्वपदावर आले. त्यामुळे कोरोनाची लसीकडे नागरिकांनी पाठ फिरविली. अनेकांनी दुसरा डोस, बुस्टर घेण्याचे टाळले. चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरू असताना या विषाणूचा बीएफ ७ (बीए ५.२.१.७) हा नवा अवतार सापडला आहे. त्यामुळे देशभरात खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली. राज्यातही आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. या सगळ्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून लसीची मागणी करण्याचे प्रमाण वाढत आहे. कोवॅक्सिन लस सहजपणे मिळत आहे. परंतु, कोविशिल्ड, कोर्बेव्हॅक्सची एकही लस उपलब्ध नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके म्हणाले, ३१ डिसेंबरला कोवॅक्सिन साठा मुदतबाह्य होणार आहे. या लसीचा डोस घेण्यासाठी जे पात्र आहेत, त्यांनी त्याचा डोस घ्यावा.

लसींची मागणी केलीमध्यंतरी नागरिकांनी लसीकडे पाठ फिरविली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असतानाही ४१ ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा दिली आणि आताही देत आहोत. नागरिक कोरोनाला विसरले होते, परंतु, मनपाची आरोग्य यंत्रणा कार्यरत होती. नागरिकांकडून लसीची मागणी होत आहे. शासनाकडे कोविशिल्ड, कोर्बेव्हॅक्स लसीची मागणी करण्यात आली आहे.- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद