शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

Corona Virus : दिलासा ! अडीच महिन्यांनंतर कोरोना मृत्यू एकेरी आकड्यात; ७ रुग्णांचा मृत्यू, १५७ बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 12:32 PM

जिल्ह्यात १६ मार्च रोजी ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दररोज दुहेरी संख्येत मृत्युसत्र सुरू होते.

ठळक मुद्देजिल्ह्यात सध्या ३,२१२ रुग्णांवर उपचार सुरूऔरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णसंख्येतही घट

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाची रुग्णसंख्या दोनशेखाली आली. दिवसभरात फक्त १५७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ६७, तर ग्रामीण भागातील ९० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मृत्यूचा आकडाही दहाखाली गेला असून, गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ७ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ३ हजार २१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात १६ मार्च रोजी ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दररोज दुहेरी संख्येत मृत्युसत्र सुरू होते. अखेर अडीच महिन्यांनंतर हा आकडा एकेरीत आला आहे. त्याबरोबरच आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही शंभरखाली आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४२ हजार ८८९ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३६ हजार ४६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १३६ आणि ग्रामीण भागातील २७२, अशा ४०८ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना सावरगाव, कन्नड येथील ५२ वर्षीय पुरुष, राजनगर, पैठण येथील ७२ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ३८ वर्षीय पुरुष, गाेलटगाव, शेकटा येथील ३० वर्षीय पुरुष, शिरोड खुर्द, फुलंब्रीतील ७० वर्षीय महिला, एसटी काॅलनीतील ८२ वर्षीय पुरुष, शहरातील ६८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णसातारा परिसर २, बीड बायपास २, गारखेडा १, शिवाजीनगर २, कांचनवाडी २, अजबनगर १, मिटमिटा १, पेठेनगर १, एन-१२ येथे १, एन-५ येथे २, हर्सूल ३, संत ज्ञानेश्वरनगर १, आंबेडकरनगर १, चेतनानगर २, सारा वैभव १, सुरेवाडी १, विश्रांतीनगर १, संभाजी कॉलनी १, एन-४ येथे १, पुंडलिकनगर १, इंदिरानगर १, माऊलीनगर १, सातारा पोलीस स्टेशनमागे १, जवाहर कॉलनी १, निसर्ग कॉलनी, भीमनगर २, तथागत चौक, बन्सीलालनगर २, द्वारकानगर पडेगाव १, गुलमंडी १, संजयनगर २, मेल्ट्रॉन एमआयडीसी २, अन्य २५.

ग्रामीण भागातील रुग्णवाळूज एमआयडीसी १, नावडी ता.कन्नड १, रांजणगाव १, भराडी ता. सिल्लोड २, फुलंब्री १, लासूर स्टेशन ता.गंगापूर १, हट्टी ता.सिल्लोड १, अन्य ८२.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू