औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी कोरोना रुग्णसंख्या दोनशेच्या उंबरठ्यावर राहिली. दिवसभरात १८६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ६९, तर ग्रामीण भागातील ११७ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ९ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २ हजार ८७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार २६० एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३७ हजार १४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील २३७ आणि ग्रामीण भागातील १२१, अशा ३५८ रुग्णांना सुटी देण्यात आली.
उपचार सुरु असताना शिवाजीनगर, कन्नड येथील ६२ वर्षीय महिला, काळा दरवाजा, किलेअर्क येथील ६५ वर्षीय महिला, न्यू श्रेयनगर, उस्मानपुरा येथील ४२ वर्षीय पुरुष, बजाजनगर येथील ५८ वर्षीय पुरुष, एकलहेरा, पिंप्रीराजा येथील ३८ वर्षीय पुरुष, रांजणगाव दांडगा, पैठण येथील ६२ वर्षीय पुरुष, संजयनगर येथील ४० वर्षीय पुरुष, वानखेडेनगर येथील ७२ वर्षीय पुरुष, शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा येथील ६४ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ६६ वर्षीय महिला, ६८ वर्षीय महिला, बीड जिल्ह्यातील ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्णसातारा परिसर २, बीड बायपास २, शिवाजीनगर ३, गारखेडा परिसर १, घाटी १, हमालवाडा १, सारा प्राईड सोसायटी, काल्डा कॉर्नर १, जालाननगर १, पहाडसिंगपुरा १, हर्सूल ३, महिंद्रा शोरुम २, बन्सीलालनगर १, सेंट्रल नाका रोड १, उस्मानपुरा १, भोईवाडा १, म्हाडा कॉलनी ३, देशमुखनगर १, जय भवानीनगर १, मुकुंदवाडी १, आंबेडकरनगर, बायजीपुरा १, एन-६ येथे १, एन-१२ येथे १, पडेगाव १, तारांगण १, एन-५ येथे १, ब्रीजवाडी २, एन-२ येथे १, एन-९ येथे २, एन-७ येथे १, देवळाई , साईनगर १, ज्ञानेश्वरनगर १, नक्षत्रवाडी १, हायकोर्ट कॉलनी १, वाल्मिकनगर १, नारळीबाग १, विमानतळ १, अंगुरी बाग २, पेठेनगर ३, बजरंग चौक १, अन्य १६
ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर ७, सिडको महानगर-१ येथे १, रांजणगाव १, पंढरपूर १, वाळूज २, वाळूज हॉस्पिटल ७, वडगाव कोल्हाटी १, पळशी १, विरमगाव १, वडगाव १, कडेठाण आडुळ १, पिशोर ता. कन्नड १, पैठण १, अटकल १, सिल्लोड १, मुलाणी वडगाव, ता. पैठण १, चिंचोली १, अन्य ८७