औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाची रोजची रुग्णसंख्या गेल्या काही दिवसापासून ५० च्या खाली स्थिरावली असून, बुधवारी दिवसभरात ३५ नव्या रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील १०, ग्रामीण भागातील २५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात २९ जणांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने दिलासा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सध्या ३०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २६३ आणि शहरातील ४२ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ८०६ एवढी झाली आहे. यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १७ आणि ग्रामीण भागातील १२ अशा २९ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना चित्तेपिंपळगाव येथील ६० वर्षीय महिला, म्हस्की, वैजापूर येथील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्णगारखेडा १, एन-६ येथे ४ यासह विविध भागात ५ कोरोना रुग्णांची वाढ झाली.
ग्रामीण भागातील रुग्णऔरंगाबाद १, गंगापूर ४, कन्नड २, सिल्लोड १, वैजापूर ९, पैठण ८