शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

Corona Virus : सर्वसामन्यांच्या लुटीला अंकुश; ऑडिटनंतर खासगी हॉस्पिटल्सनी २७ लाख परत केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2021 4:22 PM

Corona Virus: गेल्या पंधरवड्यात १४ खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचारासाठी वैद्यकीय देयकांमध्ये ४४ लाख ७७ हजार १३१ रुपये इतकी ज्यादा रकमेची आकारणी केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या.

ठळक मुद्देदुसऱ्या टप्प्यातील १४ हॉस्पिटल्सकडून वसुलीची प्रक्रिया अंतिम टप्प्यातजिल्हाधिकारी म्हणाले, कुणालाही सोडणार नाही

- विकास राऊत

औरंगाबाद : शहरातील खासगी हॉस्पिटल्सने कोरोना महामारीच्या आपत्तीला इष्टापत्ती समजून रुग्णांची लूट सुरू केल्याच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर एप्रिल ते आजवर रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारल्याने २८ हॉस्पिटल्सना सुमारे ७५ लाख रुपये जास्तीचे बिल घेतल्याच्या नोटिसा जिल्हा प्रशासनाने बजावल्या. त्यातील २७ लाख रुपये प्रशासनाने वसूल करून रुग्णांना दिले आहेत. २८ पैकी १० हॉस्पिटल्सने रक्कम परत केली. ४ हॉस्पिटल्सवर कारवाईचा प्रस्ताव आहे. १० हॉस्पिटल्सने रक्कम परत करण्याची तयारी दर्शविली आहे.

गेल्या पंधरवड्यात १४ खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचारासाठी वैद्यकीय देयकांमध्ये ४४ लाख ७७ हजार १३१ रुपये इतकी ज्यादा रकमेची आकारणी केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. यातील काही हॉस्पिटल्सने रक्कम रुग्णांना परत केली आहे, काहींनी १० दिवसांची मुदत मागितली आहे. ४ हॉस्पिटल्सने काहीही प्रतिसाद दिलेला नाही, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासकांकडे दिला आहे. रेकॉर्डवर असलेल्या तक्रारी वगळता ऑडिटर्सने फोनवरून सुमारे ५९ लाख रुपयांचे कन्सेशन बिलांमध्ये संबंधित रुग्णांना मिळवून दिले आहे.

७८ हॉस्पिटल्ससाठी ४९ ऑडिटरशहरातील ७८ कोविड हॉस्पिटल्ससाठी विविध विभागांतील ४९ ऑडिटरची टीम स्थापन केलेली आहे. दैनंदिन बिल तपासणे, तक्रारीनुसार बिलांची उलटतपासणी करून हॉस्पिटल्सला नोटीस देण्यात आहे. दोन महिन्यांत १० हॉस्पिटल्सकडून २७ लाख रुपये वसूल करून रुग्णांना परत केले आहेत. धूत आणि हेडगेवार हॉस्पिटलने न्यायालयात धाव घेतली आहे, तर ४ हॉस्पिटल्सवर कारवाईच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.

१४ हॉस्पिटल्सना दिल्या नोटिसाकृष्णा हॉस्पिटलने ३० लाख ८७ हजार ५०० रुपयांचे जास्तीचे बिल आकारले आहे. ग्लोबल इंटरनॅशनल हॉस्पिटलने ३ लाख ९९ हजार, धूत हॉस्पिटलने ६ लाख ८८ हजार १८३ रुपये, हेडगेवार हॉस्पिटलने २९ हजार ६४ रुपये, सुमनांजली हॉस्पिटल ८११३, आशिष हॉस्पिटल ७० हजार ४००, धनवई हॉस्पिटल १२२००, मेडिकव्हर हॉस्पिटल ४९ हजार २७१, सनशाईन हॉस्पिटल ५६ हजार ५००, ओरियन सिटी केअर हॉस्पिटल ३९ हजार ४००, ईश्वर हॉस्पिटल १६ हजार, एशियन हॉस्पिटल ५९००, अजंठा हॉस्पिटल ११ हजार, वायएसके हॉस्पिटलने ४६०० रुपये जास्तीचे बिल कोरोना रुग्णांकडून घेतले आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले, कुणालाही सोडणार नाहीजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात २७ लाख रुपयांची अतिरिक्त बिलांची वसुली करून ती रुग्णांना परत केली आहे. आता १४ हॉस्पिटल्सना आगाऊ बिल घेतल्यामुळे नोटिसा दिल्या आहेत. ज्यांनी जास्तीचे बिल आकारले, त्यांना सोडणार नाही. या महामारीचा कुणीही गैरफायदा घेऊ नये, सामान्यांची लूट कुणी करीत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही.

कोरोना रुग्णांवर उपचार करणारे हॉस्पिटल्स - ७८किती ऑडिटर नेमले आहेत - ४९बिल जास्त घेतल्याच्या तक्रारी - १८ तक्रारी रेकॉर्डवरऑन दी स्पॉट बिलात कपात - ५९ लाख रुपये

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादMONEYपैसाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद