शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

corona virus: तिसरी लाट वेगात, जिल्ह्यात कोरोनाचे त्रिशतक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 3:28 PM

corona virus: आतापर्यंत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अकराशेवर गेली आहे

औरंगाबाद : कोरोनाच्या (corona virus in Aurangabad ) तिसऱ्या लाटेचा वेग झपाट्याने वाढत असून, सोमवारी नव्या रुग्णांची संख्या तीनशेपार गेली. दिवसभरात ३१७ नव्या रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील सर्वाधिक २७६ आणि ग्रामीण भागातील ४१ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सोमवारी ३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात शहरातील २८ आणि ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार ३८४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात सध्या १,१४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रविवारी नव्या रुग्णांची संख्या दोनशेपार गेली होती. एकाच दिवसानंतर सोमवारी रुग्णसंख्येने तीनशेचा आकडा पार केला. यामध्ये शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाल्याची परिस्थिती आहे. शहरातील प्रत्येक भागात कोरोनाने हातपाय पसरल्याने चिंता व्यक्त होत आहे.

मनपा हद्दीतील रुग्णऑरेंज सिटी १, मिलेनियम पार्क १, सदाशिवनगर १, शिवाजीनगर ४, एन - तीन येथे ३, बीड बायपास ४, कासलीवाल तारांगण १, सातारा परिसर १, गारखेडा २, एन - चार येथे ५, उल्कानगरी २, सिडको १, हनुमाननगर १, चार्लानगर १, राजनगर १, बसैयेनगर १, संजयनगर १, एन-दोन येथे २, म्हाडा कॉलनी २, पैठण रोड १, औरंगपुरा १, इटखेडा १, बन्सीलालनगर ३, समर्थनगर २, वेदांतनगर ३, पडेगाव ६, राजाबाजार १, उस्मानपुरा २, रेल्वे स्टेशन १, अहिंसानगर १, टाऊन सेंटर १, भानुदासनगर १, विद्यानिकेतन कॉलनी १, कांचनवाडी १, देवानगरी १, रामनगर १, भोईवाडा १, नवाबपुरा १, हनुमाननगर १, पदमपुरा २, वेदांतनगर १, पैठण रोड १, श्रेयनगर १, मयुर पार्क १, भगतसिंगनगर १, बेगमपुरा १, अन्य २०२.

ग्रामीण भागांतील रुग्णऔरंगाबाद १२, फुलंब्री १, गंगापूर ११, कन्नड ३, खुलताबाद १, वैजापूर ५, पैठण ८.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद