शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

corona virus : लस हाच उपाय; लस घेतलेल्या एकाचाही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 3:28 PM

vaccine is the remedy for corona virus : आतापर्यंत ३ लाख ७१ हजार १०८ जणांना दिली लस घेतली. त्यात पहिला डोस ३ लाख ३१ हजार १८९ जणांनी घेतला, तर दुसरा डोस ३९ हजार ९१९ जणांनी घेतला

ठळक मुद्देपहिल्या डोसनंतर ५० तर दुसऱ्या डोसनंतर केवळ १६ बाधितपहिल्या डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०१ टक्के पॉझिटिव्हदोन्ही डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०४ टक्के पॉझिटिव्ह

- योगेश पायघनऔरंगाबाद : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात एकीकडे ग्रामीण भागात लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे, तर शहरात लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. जिल्ह्यात पहिली लस घेतल्यावर आतापर्यंत ५० जणांना बाधा झाली, तर दुसरी लस घेतल्यावर १६ जण बाधित झाले. मात्र, लस घेतलेल्यांपैकी एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत ३ लाख ७१ हजार १०८ जणांना दिली लस घेतली. त्यात पहिला डोस ३ लाख ३१ हजार १८९ जणांनी घेतला, तर दुसरा डोस ३९ हजार ९१९ जणांनी घेतला. जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ३०.८४ टक्के शहरात तर १८.४९ टक्के पहिला डोस, तर दुसरा डोस शहरात ५.२४ तर ग्रामीणमध्ये १.३४ टक्के लोकांनी घेतला आहे. एप्रिलअखेर उद्दिष्टपूर्तीची तयारी आरोग्य विभागाची होती. मात्र, लसींच्या तुटवड्याने लसीकरण मोहिमेची गती कमी झाली आहे. लसीकरणानंतरही मास्क, सुरक्षित अंतर आणि हात स्वच्छ धुण्याची त्रिसूत्री पाळण्याची गरज आहे. लसीकरण केल्यावरही आतापर्यंत ६६ जणांना कोरोनाची बाधा झाली, यात प्रामुख्याने डाॅक्टर, हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्सची संख्या असून, लस घेतल्यानंतर गंभीर होण्याचे प्रमाण फारच कमी दिसून आल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०१ टक्के पॉझिटिव्हजिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर, आतापर्यंत पहिल्या डोसनंतर शहरात २२ तर ग्रामीण भागात २८ जणांना कोरोनाची बाधा झाली. हे प्रमाण एकूण लसीकरणाच्या ०.०१ टक्के आहे.

दोन्ही डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०४ टक्के पॉझिटिव्हआतापर्यंत ३९ हजार ९१९ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यात शहरातील १२ तर ग्रामीणमधील ४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. हे प्रमाण ०.०४ टक्के आहे.

लसीनंतर रुग्ण गंभीर होत नाहीपहिला व दुसरा लसीचा डोस घेतल्यानंतर एकाही मृत्यूची नोंद वाॅररूमकडून प्राप्त माहितीत नाही. लस सुरक्षित आहे. लसीमुळे नंतर बाधा झाली, तरी गंभीर होणारे रुग्ण दिसून आलेले नाही, असे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.नीता पाडळकर यांनी सांगितले, तर ग्रामीण भागात लस घेतल्यानंतर एकाही मृत्यूची नोंद नाही. लस महत्त्वाचीच असून, लसीकरण करून त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी विजयकुमार वाघ म्हणाले.

लस घेतल्यास धोका कमीशासकीय संस्थांमध्ये सर्वाधिक कोविड बेडची सुविधा देणारी संस्था म्हणून राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था घाटी आहे. येथे गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गंभीर रुग्णांत एकाही रुग्णाने लस घेतलेली दिसून आलेले नाही. त्यामुळे लस घेतल्याने कोरोनाचा धोका कमी होतो, असे सर्वसाधारण निरीक्षण आहे. मलाही दोन्ही लस घेतल्यावर बाधा झाली. वय, इतर आजार असतानाही मी कोरोनाबाधित काळात गंभीर झाले नाही. त्यामुळे धोका कमी होऊन बरी झाले.- डाॅ.कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद

एकूण रुग्ण - १,१४,४९५कोरोनामुक्त - ९७,१९८कोरोनाने मृत्यू - २,२७५आतापर्यंत एकूण लसीकरण - ३,७१,१०८केवळ पहिला डोस घेतला - ३,३१,१८९दोन्ही डोस घेतले - ३९,९१९

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद