शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

मराठवाड्यात कोरोनाचा कहर; १५ दिवसांत पाचपटीने वाढले रुग्ण; ५३६ कन्टेंनमेंट झोन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 7:39 AM

१ मार्चला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६२ टक्के होते. १६ मार्चला ते प्रमाण ८९.८१ टक्के झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे यातून दिसते आहे. मृत्यूदर कमी असणे ही एक जमेची बाजू सध्या आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाचा कहर वाढत असून, १५ दिवसांत पाचपट रुग्ण वाढले आहेत. १ मार्चला विभागातील ८ जिल्ह्यांतील शहर आणि ग्रामीण मिळून ६८७ रुग्ण कोरोनाग्रस्त होते. १६ मार्चला सकाळी ९ वाजेपर्यंत हा आकडा २६०० पर्यंत गेला आहे. शहरी भागात १४४२ तर ग्रामीणमध्ये ११५८ रुग्णांची नोंद झाली आहे. यावर उपाय म्हणून होम आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. ४०० वरून ५३६ कन्टेंनमेंट झोन सध्या विभागात आहेत.

१ मार्चला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६२ टक्के होते. १६ मार्चला ते प्रमाण ८९.८१ टक्के झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे यातून दिसते आहे. मृत्यूदर कमी असणे ही एक जमेची बाजू सध्या आहे. १५ दिवसांपूर्वी ६ हजार ३३३ नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले होते, तर १४ हजार ३२ नागरिक होम क्वारंटाइन करण्यात आले होते. आज रोजी विभागात ३२ हजार ३९३ नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे, तर १२ हजार ११५ नागरिक इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन आहेत.

रुग्णवाढीत औरंगाबाद आघाडीवररुग्णवाढ होण्यात औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे. शहरात तीन दिवसांपासून ८०० च्या पुढे रुग्ण आढळत आहेत, तर ग्रामीण भागात २०० च्या पुढे आकडा चालला आहे. औरंगाबाद खालोखाल जालना, नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांचा क्रमांक आहे. हिंगोली आणि उस्मानाबादमध्ये रुग्णसंख्या कमी आहे.

उपाययोजनांसाठी निधीची मागणीविभागात कोरोनाशी लढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ३३ टक्के निधीची मान्यता मिळाली होती; परंतु हा सर्व निधी पायाभूत सुविधांवर खर्च झाला आहे. विभागातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयेही डीपीडीसीच्या निधीवरच अवलंबून आहेत. त्यामुळे विभागीय प्रशासनाने निधीची मागणी शासनाकडे केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNandedनांदेडBeedबीडlaturलातूर