औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी सकाळी ११३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २७३९ झाली आहे. यापैकी १४५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १४३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ११३८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांत राजाबाजार २, न्यू हनुमान नगर २, बायजीपुरा १, खोकडपुरा २, बांबट नगर, बीड बायपास २, साई नगर, एन सहा २, राजमाता हाऊसिंग सोसायटी १, माया नगर, एन दोन ३, संजय नगर, आकाशवाणी परिसर १, रशीदपुरा २, यशोधरा कॉलनी २, सिडको पोलिस स्टेशन परिसर १, सिल्क मील कॉलनी १, किराडपुरा १, पीरबाजार १, शहानूरवाडी १, गजानन मंदिर परिसर, गारखेडा २, अहिल्या नगर, मुकुंदवाडी १, जहाँगीर कॉलनी, हर्सुल १, कैलास नगर १, समर्थ नगर १, छावणी परिसर ४, गौतम नगर १, गुलमंडी ५, भाग्य नगर १, गजानन नगर, गल्ली नं नऊ ४, मंजुरपुरा १, मदनी चौक १, बेगमपुरा १, रेहमानिया कॉलनी १, काली मस्जिद परिसर १, क्रांती चौक परिसर १, विश्रांती नगर १, जिल्हा परिषद परिसर ४, राम नगर १, देवगिरी कॉलनी सिडको २, स्नेहांकित हाऊसिंग सोसायटी १, नक्षत्र वाडी २ हे शहरी भागात रुग्ण आढळून आले.
ग्रामीण भागात रुग्णांची झपाट्याने वाढ
ग्रामीण भागात रुग्णांची झपाट्याने वाढत आहे. कन्नड ५, देवगिरी नगर, सिडको वाळूज १, बजाज नगर १५, वडगाव कोल्हाटी २, बकलवाल नगर, वाळूज १, रांजणगाव १, सलामपूर, पंढरपूर ११, वलदगाव १, साई समृद्धी नगर कमलापूर २, अज्वा नगर १, फुले नगर, पंढरपूर ४, गणेश नगर, पंढरपूर १, वाळूजगाव, ता. गंगापूर १, शाहू नगर, सिल्लोड १, मुस्तफा पार्क, वैजापूर १, अन्य २ या भागात कोरोनाबाधित आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. बाधीत रुग्णांत यामध्ये ३८ स्त्री व ७५ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.