औरंगाबाद : जिल्ह्यात संशयितांचे घेण्यात आलेल्या ७९५ स्वॅबपैकी १३८ जणांचे अहवाल सकारात्मक आल्याने १३८ कोरोनाबाधित रुग्णांची आणखी भर पडली आहे. त्यात मनपा हद्दीत १०१ तर ग्रामीण भागातील ३७ रुग्णांचा समावेश आहे.
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांत ७८ पुरूष तर ६० महिला असून आतापर्यंत एकूण ६४०२ कोरोनाबाधित आढळले त्यापैकी ३१२६ रुग्ण बरे झाले तर २८९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सध्या २९८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा हद्दीत १०१ रुग्ण रघुवीर नगर १, आलमगीर कॉलनी १, हर्सुल ३, शाह बाजार १, मुकुंदवाडी १, आंबेडकर नगर १, नवाबपुरा ३, लोटा कारंजा १, बाबू नगर ५, जाधववाडी १, गुलमोहर कॉलनी ५, देवळाई परिसर २, कांचनवाडी ४, सहकार नगर १, रेल्वे स्टेशन परिसर २, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी २, उल्कानगरी, गारखेडा २, बंबाट नगर २, मिसारवाडी ८, हर्ष नगर १, एन बारा १, एन अकरा, सिडको ३, नवजीवन कॉलनी २, हडको १, छावणी २, एमजीएम परिसर १, पडेगाव ३, गजानन कॉलनी १०, पद्मपुरा, कोकणावाडी ३, गादिया विहार २, बुड्डी लेन १, सिडको ४, तारक कॉलनी २, उस्मानपुरा १, क्रांती चौक २, राम नगर १, समता नगर २, मिलिंद नगर १, अरिहंत नगर ५, विठ्ठल नगर ६, शिवेश्वर कॉलनी, मयूर पार्क १ आदी रुग्ण शहरी भागातील आहे.
ग्रामीण भागात ३७ रुग्ण
रांजणगाव २, गोंदेगाव १, डोंगरगाव १, द्वारकानगरी, बजाज नगर २, वाळूज महानगर सिडको, बजाज नगर ५, जिजामाता सो., वडगाव १, जीवनधारा सो., बजाज नगर ३, सिडको महानगर १, सपना मार्केट जवळ, बजाज नगर १, वडगाव कोल्हाटी १, इंड्रोस सो., बजाज नगर १, विश्वविजय सो., बजाज नगर १, कृष्णकोयना सो., बजाज नगर २, वडगाव, बजाज नगर २, धनश्री सो., बजाज नगर १, सायली सो., बजाज नगर १, प्रताप चौक, बजाज नगर २, श्रीराम सो., बजाज नगर १, शनेश्वर सो., बजाज नगर १, वृंदावन हॉटेल जवळ, बजाज नगर १, साजापूर १, सारा परिवर्तन सावंगी ३, कुंभारवाडा, पैठण १ फत्ते मैदान, फुलंब्री १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.