ठळक मुद्देजिल्ह्यात बुधवारी सकाळी १२३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
औरंगाबाद : घाटी रुग्णलयात उपचार सुरू असताना ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मयत रुग्णांची संख्या ६४८ झाली आहे.
पिसादेवी -हर्सूल येथील ६० वर्षीय महिला, एन-११, सिडको येथील ७० वर्षीय महिला आणि एकतानगर-हर्सूल येथील ६३ वर्षीय महिला रुग्णाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
आज १२३ बाधितांची वाढजिल्ह्यात बुधवारी सकाळी १२३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या २१, ५१५ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६, ४४० रूग्ण बरे झाले आहेत. तर ६४८ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ४४२७ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.