औरंगाबाद : हिमायत नगर हिमायत बाग येथील कोरोनाबाधीत 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान सोमवारी मध्यरात्री साडे बारा वाजता मृत्यू झाला. अशी माहिती घाटीचे माध्यम समन्वयक डॉ अरविंद गायकवाड यांनी दिली. हा शहरातील आतापर्यंतचा 35 वा बळी ठरला आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या वृद्ध रुग्णाला ताप खोकला आणि दम लागत असल्याने महापालिकेने 17 मे रोजी त्यांचा स्वब घेतला होता. 18 मे रोजी सकाळी साडेसात वाजता त्यांचा हवाला पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्याची तब्बेत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. रात्री 10.50 वाजता प्रकृती गंभीर झाल्याने वृद्ध रुग्णाला घाटीत भरती करण्यात आले. कृत्रिम श्वास त्यांना देण्यात आलेला होता. मात्र, रात्री साडे बारा वाजता त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी त्यांची बायपास शस्त्रक्रिया झालेली होती. तर मधुमेह, कोरोना मुळे न्यूमोनिया आणि तीव्र श्वसन विकार यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. गायकवाड यांनी कळवले आहे.
औरंगाबादची रुग्णसंख्या १०७३ वर
दरम्यान, शहरात मंगळवारी सकाळी ५१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १०७३ झाली आहे. रोहिदास नगर १, शिवशंकर कॉलनी १, जाधववाडी १, जटवाडा रोड १, हिमायत बाग १, किराडपुरा ४, पुंडलिक नगर १, मुकुंदवाडी १, नारेगाव १, जयभीम नगर १, संजय नगर १, रहिम नगर १, कैलास नगर १, गादल नगर १ सादात नगर, गल्ली नं. ६ येथील ४, शिवनेरी कॉलनी १, विधिया नगर, सेव्हन हिल १, गल्ली नं. २५, बायजीपुरा ४, दुर्गा माता कॉलनी, न्याय नगर १, मकसूद कॉलनी १, जाधववाडी १, गल्ली नं. २३, बायजीपुरा २, गल्ली नं. ३, बायजीपुरा १, सातारा गाव ३, आदर्श कॉलनी, गारखेडा ३, गारखेडा परिसर १, मित्र नगर १, मिल कॉर्नर १, शिवशक्ती नगर, मुकुंदवाडी १, मुकुंद नगर, मुकुंदवाडी १ अन्य ४ आणि गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा ३ या भागात नवे कोरोनाबाधित आढळून आले. त्यात १७ महिला व ३४ पुरुषांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.