औरंगाबाद : शहरात कोरोनाने रेहमानिया कॉलनीतील ५० वर्षीय महिलेचा बुधवारी पहाटे ५.३५ वाजता मृत्यू झाला. या महिलेला १९ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दिवशी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या मृत्यूमुळे कोरोनाने एकूण मयत रुग्णांची संख्या ३९ झाल्याचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
बुधवारी सकाळी जयभीमनगर येथील ५५ वर्षीय आणि इंदिरानगर- बायजीपुरा येथील ८० वर्षीय रुग्ण आणि कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यानंतर सायंकाळी रेहमानिया कॉलनीतील ५० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी सकाळी ४० कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १११६ झाली आहे.
'सिव्हिल'मधील डॉक्टर आणि कुटूंबीय पॉझिटिव्हजिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (आरबीएसके) मधील डॉक्टर व परिवारातील तीन सदस्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या डॉक्टरांनी कोरोना रुग्णांच्या तपासणीत महत्वाचे योगदान दिले आहे. यासह जिल्हा रुग्णालयातील अन्य एक कर्मचारीही कोरोनाबाधित आढळून आला आहे.