औरंगाबाद : शहरातील रुग्ण संख्येत मागील दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी दुपारी कोरोना बाधितांची संख्या १०५ वर गेल्याचे स्पष्ट झाले. तर रात्री आणखी चार रुग्णांची भर पडत हा आकडा १०९ वर गेल्याने शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. या एक एसआरपीएफ जवान पॉझिटिव्ह आढल्याने खळबळ उडाली आहे.
रात्री आढळून आलेले रुग्ण चेलीपुरा, असिफिया कॉलनी, पैठण गेट, सातारा परिसर येथील प्रत्येकी एक असल्याचे डॉ नीता पाडळकर यांनी सांगितले यापैकी 3 पुरुष एक महिला आहेत. तसेच यातील एक रुग्ण हा एसआरपीएफ जवान असल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, औरंगाबादेत कोरोनाने मंगळवारी शतक पार केले. सकाळी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत नाही, तोच दुपारी आणखी १० नागरिकांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या १०५ वर पोहनचली होती.