औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ४६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४५३ झाली आहे. यापैकी ९१६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. तर आतापर्यंत ६८ बाधीत रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू, तर ४६९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
शुक्रवारी आढळलेले रुग्ण नेहरू नगर, कटकट गेट १, कैलास नगर, माळी गल्ली १, एन सहा सिडको १, भूषण नगर, पहाडे कॉर्नर १, कैलाश नगर २, श्रीनिकेतन कॉलनी १, खडकेश्वर १, उस्मानपुरा १, खंडोबा मंदिर, सातारा गाव २, इटखेडा ३, उस्मानपुरा ३, जुना बाजार १, विश्रांती कॉलनी एन २ येथील ३, नारळी बाग गल्ली नं.२ येथील १, राशेदपुरा, गणेश कॉलनी १, शिवशंकर कॉलनी, गल्ली नं.१ येथील १ , बायजीपुरा गल्ली नं.२ येथील १, एन ४ विवेकानंद नगर,सिडको १, शिवाजी नगर १, एन ६ संभाजी कॉलनी १, गजानन नगर एन ११ हडको ५, भवानी नगर, जुना मोंढा १, जुना बायजीपुरा २, किराडपुरा १, रोशनगेट १, राशीदपुरा १, मोतीवाला नगर १, दौलताबाद २, वाळूज सिडको २, राम नगर, कन्नड २ या भागातील बाधीत आहेत. यात १४ महिला आणि ३२ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.