शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus : औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या ५४५ वर; आणखी ३७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 8:40 AM

मागील तीन दिवसात 167 रुग्णांची भर

औरंगाबाद :  रविवारी सकाळी 38 रुग्णांची भर पडल्याने 508 वरून एकूण बधितांची संख्या 546 झाली आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली. मागील तीन दिवसात शहरात शुक्रवारी 100, शनिवारी 30 आणि रविवारी 37 अहवाल पॉझिटिव्ह आले,यात एका पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला अशा रीतीने 167 रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

रविवारी सकाळी शहरातील दत्त नगर 1, चंपा चौक 5, राम नगर 15 या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली. तसेच रामनगर4, रोहिदास नगर 2 संजय नगर 1, सिल्कमिल कॉलनी 8, वसुंधरा कॉलनी एन 7 सिडको, एमआयटी कॉलेज बीड बायपास येथील प्रत्येकी एकजण पॉझिटिव्ह असल्याचे घाटी रुग्णालयाचे माध्यम समन्वयक डॉ अरविंद गायकवाड यांनी सांगितले. यामुळे रुग्णसंख्या 37 ने वाढली असून शहरातील एकूण रुग्णसंख्य 545 वर गेली आहे.

दरम्यान, शहरात शुक्रवारी दिवसभरात १०० रुग्णांची विक्रमी वाढ झाल्यावर शनिवारी सकाळी १७, दुपारच्या सत्रात १३ अशा दिवसभरात ३० पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडून बाधित रुग्णांची संख्या ५०८ वर गेली. शनिवारी सकाळी संयजनगर- मुकुंदवाडी ६, असिफिया कॉलनी १, कटकटगेट २, या जुन्या भागांसह बाबर कॉलनी ४, भवानीनगर जुना मोंढा २, सिल्कमील काॅलनी व रामनगर येथील प्रत्येकी एक अशी १७ रुग्ण आढळून आली. यात १७ रुग्णांत १० महिलांसह ७ पुरुषांचा समावेश आहे. दुपारी आढळलेल्या तिघांत सातारा परिसरातील ५० वर्षीय पुरुष, पंचकुवा किलेअर्क येथील ३५ वर्षीय महिला, जुना बाजार येथील ७५ वर्षीय वृद्ध यांचा  समावेश आहे. तर त्यानंतर आढळून आलेल्या दहा रुग्णांमध्ये गंगापूरमधील १ आणि पुंडलिक नगर येथील ९ जणांचा समावेश आहे. यामुळे शनिवारी दिवसभरात एकूण ३० रुग्णांची भर पडून एकूण रुग्ण संख्या ५०८ वर गेली. वाढलेली रुग्णसंख्या आणि नवीन भागात रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद