औरंगाबाद : खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महेमुदपुरा येथील ५५ वर्षीय महिलेचा सोमवारी दुपारी १ वाजता मृत्यु झाला. यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आतापर्यंतच्या बळींचा आकड ५६ वर गेला आहे.
महेमुदपुरा येथील ५५ वर्षीय महिलेस २८ एप्रिल रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा २९ एप्रिल रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना कृत्रीम श्वास देऊन उपचार सुरु होते. सोमवारी दुपारी कोविडमुळे एका पेक्षा जास्त अवयवांचे काम प्रभावित झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. सोबत मधुमेह व उच्चरक्तदाबही होता असे खाजगी डॉक्टरांनी कळवले आहे.
दरम्यान, कोरोनाबधित गंभीर असलेल्या चार महिलांसह एका पुरुषाचा रविवारी सायं. ९.३० ते सोमवारी सकाळी ६.३० दरम्यान ५ मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. यात सिल्लोड, कटकट गेट, रोहीदासनगर, कैलासनगर येथील महिलांचा तर न्यायनगरातील पुरुषाचा समावेश आहे. कटकटगेट येथील ५५ वर्षीय महिलेचा रविवारी रात्री साडेनऊ वाजता मृत्यू झाला. न्यायनगर, गारखेडा येथील ४८ वर्षीय पुरुषाचा रविवारी रात्री ९.३५ वाजता, रोहिदासनगर येथील ३४ वर्षीय महिलेला मध्यरात्री एक वाजता, कैलास नगर येथील ७५ वर्षीय महिलेचा सोमवारी पहाटे ३.१५ वाजता मृत्यू झाला. तर सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील ५५ वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी साडेसहा वाजता मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले.
शहरात १३०१ रुग्णसोमवारी (दि २५) सकाळच्या सत्रात १६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण संख्या १३०१ झाली आहे. शहरातील सुभाषचंद्र बोस नगर ( एन ११, हडको)- ४, भवानी नगर- २, रोशन गेट -१ , हुसेन कॉलनी-१, बायजीपुरा- १, इटखेडा (पैठण रोड)- १, अल्तमश कॉलनी- १, जवाहर नगर (गारखेडा परिसर ) -१, शाह बाजार-१, मयूर नगर ( एन-6, सिडको)- १, राम नगर ( एन २ ) - १, गजानन मंदिर परिसर - १ या भागात कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये १० महिला आणि ६ पुरूष रुग्णांचा समावेश आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.