औरंगाबाद : एन १२ येखील ६५ वर्षीय वृद्धाला २१ मे रोजी खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब २३ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. कोव्हीडमुळे न्युमोनिया त्यात मधुमेहाचा आजारा त्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी ६.०५ वाजता मृत्यू झाला. असे रुग्णालयाच्या डाॅक्टरांनी कळवले आहे. या मृत्यूमुळे शहरातील मृत्यूचा एकुण आकडा ६९ झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ४६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४५३ झाली आहे. यापैकी ९१६ कोरोनाबधित रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर ४६८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
या भागात आढळून आले बाधित नेहरूनगर (कटकटगेट ) -१, कैलासनगर (माळीगल्ली)-१, एन-६ (सिडको) -१, भूषणनगर (पहाडे कॉर्नर)- १, कैलाशनगर-२, श्रीनिकेतन कॉलनी-१, खडकेश्वर-१, उस्मानपुरा-१, खंडोबा मंदिर (सातारा गाव ) - २, इटखेडा-३, उस्मानपुरा-३, जुना बाजार-१, विश्रांती कॉलनी (एन-२)-३, नारळी बाग ( गल्ली नं.२ ) - १, राशेदपुरा (गणेश कॉलनी)-१, शिवशंकर कॉलनी (गल्ली नं.१)-१ , बायजीपुरा ( गल्ली नं.२ )- १, विवेकानंद नगर (एन-४,सिडको)-१, शिवाजीनगर-१, संभाजी कॉलनी (एन-६)- १, गजानननगर (एन-११, हडको)- ५, भवानीनगर (जुना मोंढा)- १, जुना बायजीपुरा- २, किराडपुरा-१, रोशनगेट-१, रशीदपुरा-१, मोतीवालानगर-१, दौलताबाद-२, वाळूज (सिडको)-२, रामनगर (कन्नड)-२
5 नव्या भागासह 2 कोरोनामुक्त भागात शिरकाव गुरुवारी पाच वसाहती कोरोनामुक्त झाल्या तोच नव्याने पाच वसाहतीत कोरोनाचे संक्रमन झाल्याचे समोर आले. भूषण नगर पहाडे कॉर्नर, श्रीनिकेतन कॉलनी, मोतीवाला नगर, गणेश कॉलनी, रशीदपुरा या नव्या भागासह खडकेश्वर, दौलताबाद या कोरोनामुक्त भागात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.