औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोनाचा विळखा वाढतच असून, आणखी २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता ६७७ झाली आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
२४ पॉझिटिव्ह रुग्णांत एन-८ येथील एका ९ महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. रामनगर-१, संजयनगर -२ , नवयुग कॉलनी-भावसिंगपुरा- १, आरटीओ ऑफिस पदमपुरा-१, भूजबळनगर - नंदनवन कॉलनी-१, वृंदावन कॉलनी-नंदनवन कॉलनी-१, नंदनवन कॉलनी-१, गंगाबावडी- नंदनवन कॉलनी-२, पुंडलीकनगर-२, हुसेन कॉलनी-३, गांधीनगर-१, जयभवानी नगर-१, विजयनगर-१, सातारा परिसर-१,रहेमानिया कॉलनी-१, घाटी परिसर -१, भडकलगेट- १ आणि अरुणोदय कॉलनी -१ अशा २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनाने आणखी दोन मृत्यू
औरंगाबादेत कोरोनाचे आणखी दोन बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. घाटी रुग्णालयात एका ९४ वर्षीय वृद्धेचा आणि ५६ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.या दोन मृत्यूमुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे.