औरंगाबाद : रहेमानिया काॅलनी येथील ३४ वर्षीय बाधीत महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी (दि.५) मृत्यू झाल्याचे प्रशासनाने कळवले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा हा ९४ वा मृत्यू ठरला आहे. तर शहरात आणखी सहा रुग्ण आढळले आहेत. यामुळे दिवसभरातील आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ६५ झाली असून एकूण रुग्णसंख्या १८३४ झाली आहे.
शहरात सकाळी ५९ रुग्ण आढळून आले होते दुपारी आणखी ६ रुग्ण आढळून आले. समता नगर १, भोईवाडा १, मिल कॉर्नर १, चिकलठाणा १, रेहमानिया कॉलनी १ किल्लेअर्क १ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्य ५ महिला आणि १ पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
३४ वर्षीय बाधीत महिलेचा मृत्यूशहरातील रहेमानिया काॅलनी येथील ३४ वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात १ जुन रोजी भरती करण्यात आले होते. त्यांना २ जूनला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. शुक्रवारी (दि. ५) सकाळी पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्या महिलेला कोरोनामुळे न्युमोनिया, तीव्र श्वसन विकार सोबत उच्चरक्तदाबही होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे.