औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी सकाळी ४७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६९६ झाली आहे. यापैकी १०८७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ८५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सध्या ५२४ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये एन-४ सिडको परिसरातील कोरोनाबाधित असलेल्या ७४ वर्षीय पुरूष रुग्णाचा बुधवारी सकाळी ६.३० वाजता खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
नव्याने निदान झालेल्या रुग्णांत जसवंतपुरा (१), संजय नगर, मुकुंदवाडी (१), खोकडपुरा (२), अजिंक्य नगर (१), समता नगर (२), समृद्धी नगर, एन-४सिडको (१), जय भवानी नगर (१), लेबर कॉलनी (२), मिल कॉर्नर (४), हमालवाडी, रेल्वे स्टेशन (१), भावसिंपुरा (२), शिवशंकर कॉलनी (५), पिसादेवी रोड (१), कटकट गेट (१), सिल्लेखाना नूतन कॉलनी (1), बारी कॉलनी (१),उल्का नगरी (१),एन-६, संभाजी कॉलनी, सिडको (१),शरीफ कॉलनी (१),कैलास नगर (४), स्वप्न नगरी, गारखेडा परिसर (१), भवानी नगर, जुना मोंढा (१), पुंडलिक नगर रोड, गारखेडा (१), विद्यानिकेतन कॉलनी (१), सुराणा नगर (२), अन्य (३) आणि यशवंत नगर, पैठण (३), अब्दुलशहा नगर, सिल्लोड (१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २१ महिला आणि २६ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
भुसावळ-जळगाव येथील रुग्णाचा मृत्यू
खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना भुसावळ-जळगाव येथील ४९ वर्षाच्या महिलेचा २ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मृत्यू झाला. ३१ मे पासून त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.