औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी आणखी १८६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. यात मनपा हद्दीतील १६८ आणि ग्रामीण भागातील १८ रुग्णांचा समावेश आहे. शहातील कोरोनाची साखळी तुटण्यासाठी लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. परंतु तरीही रूग्ण आढळने सुरूच आहे. यासोबतच उपचारादरम्यान दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबधितांची संख्या ८६५० झाली आहे. त्यापैकी ५०६१ बरे झाले असून आतापर्यंत ३५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण ३२३३ जणांवर उपचार सुरु आहेत. नव्याने आढळून आलेल्या ९ रुग्णांची शहर प्रवेशवेळी अँटीजेन टेस्टद्वारे केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. औरंगाबादेत १० जुलैपासून लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. त्याचा सोमवारी चौथा दिवस आहे. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी लॉकडाऊन महत्वपूर्ण आहे. परंतु शहरात दोनशेच्या घरात रूग्ण आढळून येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यूएन-६, सिडको येथील ४९ वर्षीय पुरुष आणि छावणी येथील ७६ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने सोमवारी दिली. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३५६ झाली आहे. कोरोनामुळे जिल्हात दररोज रुग्णांचा मृत्यू होणे सुरूच आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण रमा नगर १, सादात नगर, रेल्वे स्टेशन परिसर २,भावसिंगपुरा १, मयूर पार्क ५, कँटोंमेट जनरल हॉस्पीटल परिसर (1), छावणी १, पद्मपुरा ३, एकनाथ नगर ३, शिवशंकर कॉलनी ८, ज्ञानेश्वर कॉलनी १, भानुदास नगर, आकाशवाणी परिसर १, मित्र नगर ४, उत्तरा नगरी, धूत हॉस्पीटलमागे १, अंगुरी बाग १, अरिहंत नगर १, एन सहा सिडको ४, एन चार सिडको १, सेव्हन हिल २, गजानन कॉलनी १, जाधववाडी १, तिरूपती कॉलनी १, विष्णू नगर ४, आयोध्या नगरी २, कांचनवाडी १, चिकलठाणा ३, विवेकानंद नगर, एन बारा हडको १, कोहिनूर गल्ली रोड १, एन नऊ पवन नगर १,एन सात, सिडको १, जय भवानी नगर १, देवळाई चौक, बीड बायपास १, रेणुका नगर, शिवाजी नगर १०, गुरूप्रसाद नगर, बीड बायपास १, जालान नगर १, एसआरपीएफ कॅम्प, सातारा १, जय नगरी, बीड बायपास ३, आयोध्या नगर १३, श्रीकृष्ण नगर २, रायगड नगर १, नारेगाव १, नक्षत्रपार्क नक्षत्रवाडी २, उस्मानपुरा १, बजाज नगर ३, अमेर नगर, बीड बायपास १, सातारा परिसर १, गारखेडा १, सातारा परिसर ९, मिल कॉर्नर १, वेदांतनगर २, काका चौक, पद्मपुरा १, नक्षत्रवाडी २, छावणी ४, पद्मपुरा १, कुँवरफल्ली १, इटखेडा ३, पडेगाव १, अशोकनगर, मसनतपूर ८, शिवशंकर कॉलनी ३, सौजन्यनगर १, सारा वैभव, जटवाडा रोड १, एन सहा, सिडको १, एन नऊ,श्रीकृष्णनगर १, जय भवानीनगर १, मुकुंदवाडी १, विठ्ठलनगर १, नागेश्वरवाडी १, उस्मानपुरा १, केसरसिंगपुरा १०, साई बाबा मंदिर परिसर, पद्मपुरा २, एन बारा ३, घाटी परिसर २, चिकलठाणा १, चिंचबन कॉलनी २, मीरा नगर, पडेगाव १
ग्रामीण भागातील रुग्णलोनवाडी, सिल्लोड १, दहेगाव, वैजापूर १, वडगाव कोल्हाटी १, गांधी नगर, रांजणगाव १, पांडुरंग सो., बजाज नगर १, अरब मोहल्ला, अजिंठा १, हनुमान नगर, अजिंठा १, रेणुका नगर, अजिंठा २, तेलीपुरा गल्ली १, मातोश्री नगर, रांजणगाव १ , आयोध्यानगर, बजाज नगर १, बजाजनगर १ गेवराई, दौलताबाद १, कुंभार गल्ली, वैजापूर ४.