औरंगाबाद : जिल्ह्यात सकाळी ७२ तर दुपारी ७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तसेच मागील सतरा तासांत एक महिला आणि चार वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या बळींची संख्या ११३ झाली आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या २१४८ झाली आहे.
शहरात मागील सतरा तासांत एका महिलेसह चार वृद्धांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. प्रशासनाच्या माहितीनुसार, ५५ वर्षीय आरीफ कॉलनीतील व्यक्तीला २३ मे रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तीव्र श्वसनविकार, न्युमोनियासह कोरोनामुळे त्यांचा सोमवारी दुपारी तीन वाजता मृत्यू झाला. ४० वर्षीय जाधववाडी येथील बाधित महिलेला सोमवारी घाटीत भरती करण्यात आले होते. क्षयरोग, न्युनोनिया, तीव्रश्वसन विकारासह न्युमोनियामुळे मध्यरात्री दिड वाजता त्यांचा मृत्यू झाला.
६५ वर्षीय जहागिरदार कॉलनी येथील बाधित वृद्ध व्यक्तीला ६ जून रोजी घाटीत भरती करण्यात आले होते. त्यांना मधुमेहासह तीव्र श्वसनविकार होता. कोरोनामुळे न्युमोनिया झाल्याने त्यांचा मंगळवारी सकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला. ७० वर्षीय युनुस कॉलनीतील वृद्धाला ४ जुनला घाटीत भरती करण्यात आले होते. मधुमेह, उच्चरक्तदाब, तीव्र श्वसनविकार आणि कोरोनामुळे झालेल्या न्युमोनियाने त्यांचा मंगळवारी सकाळी ७.१५ वाजता मृत्यू झाला. ८३ वर्षीय रमानगर,क्रांतीचौक येथील वृद्धाला सोमवारी घाटीत भरती करण्यात आले होते. त्यांचा न्युमोनियासह तीव्र श्वसनविकाराने मृत्यू झाला. त्यांचा मृत्यूपश्चात मंगळवारी अहवाल पॉझिटिव्ह आला. असे एकूण पाच मृत्यू गेल्या सतरा तासांत घाटी रुग्णालयात झाले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या ११३ झाली आहे, असे घाटी प्रशासनाकडून कळवण्यात आले.
येथे आढळले कोरोनाबाधित : वडगाव कोल्हाटी-१, बजाजनगर (मोरे चौक) -३, पंढरपूर परिसर-१, बारी कॉलनी-२, रोशन गेट-३, कोहिनूर कॉलनी (पानचक्कीजवळ ) -१, नागसेन नगर (उस्मानपुरा) -१, भवानीनगर (जुना मोंढा)-१, मिलकॉर्नर-१, संजयनगर (मुकुंदवाडी)-२, असेफिया कॉलनी-१, बुद्धनगर (जवाहर कॉलनी ) -१, जाधववाडी-१, पेठेनगर (निसर्ग कॉलनी)-१, नारेगाव-१, एन-११ (मयूरनगर, हडको)-१, बिस्मिला कॉलनी-१, रहेमानिया कॉलनी-२, एन-८ ( सिडको)-१, हर्सूल परिसर-२, सिल्लेखाना-१, बंजारा कॉलनी-२, कटकटगेट (शरीफ कॉलनी)- १, एसटी कॉलनी ( कटकट गेट )-२, संजयनगर (बायजीपुरा)- १, गणेश कॉलनी (मोहनलालनगर)-४, वसंत नगर (जवाहर कॉलनी)-१, त्रिमूर्ती चौक (जवाहर कॉलनी)- २, समतानगर -२, पडेगाव-१, रोहिणीनगर-१, न्यायनगर-१, गादियाविहार-२, शिवाजीनगर -१, गारखेडापरिसर-३, अशोकनगर (एमआयडीसी, मसनतपूर)-२, व्हीआयपी रोड (काळीवाडा)-१, सिटी चौक-२, युनुस कॉलनी-१, नूतन कॉलनी-१, रवींद्रनगर-१, दशमेशनगर-१, अरिहंतनगर-१, विद्यानगर-१, एन-४ (गुरू साहनीनगर)-१, अंबिकानगर-१, पोलिस कॉलनी (मुकुंदवाडी)-१, एन-६ (सिडको)-१, कैलासनगर-१, रोकडा हनुमान कॉलनी-१, जटवाडा रोड परिसर-१, अन्य १; इंदिरानगर-१, गादियाविहार-१, रमानगर (क्रांती चौक)-१, नूतन कॉलनी-१, कैसर पार्क-१, गल्ली नं.१८ (संजय नगर, मुकुंदवाडी)-१, समतानगर-१ या भागात बाधित आढळून आले. या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २७ महिला आणि ५२ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.