औरंगाबाद: औरंगाबादेत कोरोग्रस्तांची साखळी वाढतच आहे. सोमवारी सकाळी ८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. यानंतर दुपारी आणखी ६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात संजय नगर ४ , किलेअर्क, हुडको एन ११ येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे शहरातील बाधित रुग्णांचा आकडा २९७ झाला आहे.
शहरात १५ मार्चला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर गेल्या दिड महिन्यात ५३ रुग्ण होते. २७ एप्रिलपासून २९,२७,२१,४९,३९, ४०, २७, १४ अशी दर दिवशी अनुक्रमे वाढ झाली. शहरातील बाधितांची संख्या २७३ वर पोहचली. यातील दहा जणांचे मृत्यू झाले असुन २४ जण कोरोनामुक्त झाले. तर एक रुग्ण पुन्हा बाधित झाला. यात नव्या भागांतही बाधित आढळायला सुरुवात झाल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.
असे वाढले रुग्ण२७ एप्रिल २९२८ एप्रिल २७२९ एप्रिल २१३० एप्रिल ४७१ मे ३९२ मे ४०३ मे २७४ मे ८ + ६ --२९७ एकुण कोरोना पॉझीटीव्ह१० मृत्यू२४ कोरोनामुक्त०१ पुन्हा बाधित