औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी १६८ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १००, तर ग्रामीण भागातील ६८ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे एकूण रुग्णसंख्या ७३०२ झाली आहे. यासोबतच शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना २ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३३० झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३८२४ रुग्ण बरे झाले असून सध्या ३१४८ जणांवर उपचार सुरू आहेत.
दोघा बाधितांचा मृत्यू हर्सूल, जटवाडा येथील ५५ वर्षीय महिला आणि विहमांडवा, पैठण येथील ३२ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने बुधवारी दिली. या दोन्ही रुग्णांचा मृत्यू ७ जुलै रोजी झाला.
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण हर्सुल जटवाडा रोड १, मिल कॉर्नर १, एन अकरा, हडको ५, सिडको १, अमृतसाई प्लाजा २१, भगतसिंगनगर १, एन सहा सिडको १, एन बारा, हडको, टीव्ही सेंटर १, एकनाथनगर १, शहागंज १, शिवाजीनगर २, कटकट गेट १, वसंत विहार १, हुसेन कॉलनी १, मारोतीनगर २, देवळाई १, सातारा गाव १, चिकलठाणा २, नंदनवन कॉलनी १, राजेसंभाजी नगर ३, स्वराजनगर १, उस्मानपुरा १, जवाहर कॉलनी १, पिसादेवी १, समर्थनगर १, एन सात, आयोध्यानगर १, हर्सुल १, खोकडपुरा ३, पैठण गेट १, शिवशंकर कॉलनी ४, पवननगर १, जाफर गेट १, पद्मपुरा १४, दशमेशनगर १, गजानननगर २, रमानगर १, सुरेवाडी १, जालाननगर ३, ज्योतीनगर १, छावणी २, रामनगर १, फुले चौक, औरंगपुरा १, एसटी कॉलनी १, जाधववाडी ३, टीव्ही सेंटर २, शिवाजी नगर, गारखेडा १.
ग्रामीण भागातील रूग्ण दत्तनगर, रांजणगाव २, रांजणगाव २, कराडी मोहल्ला, पैठण १, वरूड काझी १, सारोळा, कन्नड १, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, अजिंठा २०, वडगाव कोल्हाटी १, सिडको बजाजनगर १, वडगाव साईनगर, बजाजनगर १, छत्रपतीनगर, वडगाव २, वडगाव, बजाजनगर १, विश्व विजय सो., बजाजनगर १, एकदंत सो., बजाजनगर १, आनंद जनसागर, बजाजनगर १, वळदगाव १, सुवास्तू सो., बजाजनगर १, सासवडे मेडिकल जवळ, बजाजनगर ६, तनवाणी शाळेजवळ,मुंडे चौक, बजाजनगर ४, साराकिर्ती, बजाजनगर २, गणपती मंदिरासमोर, बजाज नगर २, पाटोदा, बजाजनगर २, वडगाव कोल्हाटी, संगमनगर, बजाजनगर २, अन्य १, बालाजी सो., बजाजनगर ४, लक्ष्मीनगर, पैठण ४, शिवशक्ती कॉलनी, वैजापूर १, नेहा विहार, तिसगाव बजाज नगर १.