औरंगाबाद : घाटीत अपघात विभागात काम करणारा 38 वर्षीय पुरुष परिचारिकेला (ब्रदर) कोरोना विषाणू संक्रमण झाले आहे. त्याचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल रविवारी रात्री आला. त्याची पुन्हा पडताळणी करण्यात येत आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत आहे. अशी माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली.
त्याच्या संपर्कात आलेली पत्नी व एका ब्रदरला ऑब्झर्व्हेशनमध्ये राहायला सांगण्यात आले असून घाटीकडून सकाळ संध्याकाळ त्याची विचारपूस करण्यात येईल. त्या ब्रदरला तीन दिवसांपासून सर्दी पडसे होते. तीन दिवस त्यांनी घाटीत ड्युटी केली. त्यामुळे लक्षणे दिसून आल्याने खबरदारी म्हणून स्वब घेण्यात आला होता. तो अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे घाटीत एकच खळबळ उडाली आहे.
शहरात रुग्णांची संख्या 11 वरशहरातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. रविवारी एकाच दिवशी ७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खडबडून जागे झाले आहे. या रुग्णांमध्ये एन ४मध्ये ३, सातारा परिसर १, देवळाई १, जलाल कॉलनी २, अरिफ कॉलनी १ आणि रोशन गेट १ अशा रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील एकाचा मृत्यूसुद्धा झाला आहे.