औरंगाबाद : कोरोनासंक्रमित २१५ देशांपैकी ७२ देशांत बाधितांची संख्या औरंगाबादपेक्षा अधिक आहे, तर उर्वरित १४३ देशांत औरंगाबाद जिल्ह्यापेक्षा बाधितांचा आकडा कमी आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार पार गेला असून, बुधवारपर्यंत ५६५ मृत्यू झाले.
शहरात मार्च महिन्यात कोरोना संक्रमण सुरू झाले, तेव्हापासून नव्या बाधितांची भर पडण्यात खंड पडलेला नाही. सुरुवातीला काही वसाहतींत असलेले संक्रमण जिल्ह्यात पसरले. विक्रमी तपासणी, नाकाबंदी, सीमाबंदी, लॉकडाऊनच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. मात्र, रुग्ण व मृत्यूसंख्येत घट झालेली नाही. रुग्णसंख्या वाढल्याने मृत्यूदर घटलेला दिसत असला तरी साडेपाचशेवर मृत्यू झाले, तर रुग्णभरतीचा आकडा वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत ७३.५३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले ही दिलासादायक बाब असली तरी २३.१९ टक्के बाधितांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान आतापर्यंत ३.२७ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी दीडशेवर देशांसह भारताच्या मृत्यूदरापेक्षाही जास्त असल्याचे दिसते.
देश एकूण बाधित मृत्यू कोरोनामुक्त उपचार सुरूऔरंगाबाद १७३०४ ५६२ १२८३३ ३९०९आयव्हरी कोस्ट १६,७१५ १०५ १२,९२६ ३,६८४डेन्मार्क १४, ८१५ ६२० १२,९२५ १२७०दक्षिण कोरिया १४,८१५ ३०५ १३६५८ ६६३पॅलेस्टिन १४,५१० १०० ८,०४५ ६,३६५बल्गेरिया १३,३९६ ४४७ ७,७७२ ५,१५५सुदान ११,९५६ ७८१ ६,२६६ ४,९०९उत्तर मॅसेडोनिया ११,८३९ ५२७ ७,६६४ ३,६४८सेनेगल ११,३१२ २३६ ७,३९० ३,६८६नॉर्वे ९,६६१ २५६ ८,८५७ ५४८मलेशिया ९०९४ १२५ ८,८०३ १६६लिबिया ५४५१ ११९ ७०१ ४६३१हाँगकाँग ४१४९ ५५ २९१६ ११७८थायलंड ३३५१ ५८ ३१६० १३३क्युबा २९५३ ८८ २४५१ ४४१श्रीलंका २८४४ ११ २५९३ २४०व्हिएतनाम ८४७ १३ ३९९ ४३५